Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भात खाल्ला की सुस्ती येते? भात खाऊनही झोप यायला नको तर लक्षात ठेवा १ गोष्ट

भात खाल्ला की सुस्ती येते? भात खाऊनही झोप यायला नको तर लक्षात ठेवा १ गोष्ट

Do you feel drowsy after eating rice : भात खाल्ला नाही तर पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि भात खाल्ला की झोप येते, त्यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 01:17 PM2023-12-15T13:17:09+5:302023-12-15T14:39:41+5:30

Do you feel drowsy after eating rice : भात खाल्ला नाही तर पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि भात खाल्ला की झोप येते, त्यावर उपाय काय?

Do you feel drowsy after eating rice? | भात खाल्ला की सुस्ती येते? भात खाऊनही झोप यायला नको तर लक्षात ठेवा १ गोष्ट

भात खाल्ला की सुस्ती येते? भात खाऊनही झोप यायला नको तर लक्षात ठेवा १ गोष्ट

'बापरे! आज दाबून भात खाल्ला, आता भयंकर झोप येणार'. 'अरेरेरे भात खायला नको होता, खूप पेंग येतेय' असं तुम्ही एकदातरी भात (Rice) खाल्ल्यानंतर म्हणाले असालचं. भात खायला तर हवा, पण बरेच जण भात खाताना अनेक गैरसमाज मनात ठेऊन खातात. भात खाल्ल्याने वजन वाढते, भात खाल्ल्याने ब्लड शुगर वाढते, भात खाल्ल्यानंतर खूप झोप येते. असे बरेचसे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत. पण भात खाल्ल्यानंतर खरंच झोप येते का?

यासंदर्भात, आरोग्य हेल्थ सेंटरचे आहारतज्ज्ञ डॉ. व्ही.डी. त्रिपाठी सांगतात, 'भात खाल्ल्यानंतर शरीरात त्याचे पचन सुरू होते. तांदळातील कर्बोदकांचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि ग्लुकोज इन्शुलिनला खेचून घेते. जस जसे इन्शुलीन वाढू लागते, तसतसे शरीरात हार्मोन्सही वाढतात. त्यामुळे शरीर सुस्त होते, आणि झोपही लागते(Do you feel drowsy after eating rice).

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत ओळखा आणि तातडीने खा बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ४ पदार्थ

ते पुढे म्हणतात, 'जेव्हा इन्शुलीनची पातळी वाढते, तेव्हा मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स वाढू लागतात. हे हार्मोन्स शरीराला शांत करतात. यामुळे भात खाल्ल्यानंतर झोप किंवा सुस्ती येते. वारंवार सुस्ती येणे हे फक्त भातामुळे होत नसून, पाण्याची कमतरता, अशक्तपणा आणि तणावामुळे देखील होऊ शकते.'

कडू मेथी कशी ओळखावी? कोथिंबीर जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी काय करावे? पाहा निवडण्याची सोपी ट्रिक

भात खाल्ल्यानंतर झोप न येण्यासाठी काय करावे?

भात खाल्ल्यानंतर अनेकांना सुस्ती किंवा झोप येते. अशावेळी डाएटमधून आपण किती प्रमाणात कार्ब्स इनटेक करत आहात, यावर विशेष लक्ष द्या. जर आपल्या आहारात कार्ब्सयुक्त पदार्थांचा समावेश असेल तर, भात कमी प्रमाणात खा. शिवाय भात खाल्ल्यानंतर थोड्या वेळासाठी शतपावली करा. जर तुमच्या फूड प्लेटमध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त कार्ब्स असतील तर, निश्चितचं तुम्हाला जास्त सुस्ती येऊ शकते. त्यामुळे आपल्या आहारात कर्बोदकांचे प्रमाण संतुलित ठेवा.

Web Title: Do you feel drowsy after eating rice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.