तोंडाचा कर्करोग हा भारतातील सर्वात सामान्य प्रकार आहे. तोंडाचा कर्करोग तोंडात कुठेही होऊ शकतो. ब-याचदा तो गाल आणि हिरड्यांमध्ये दिसून येतो. बहुतांश लोकं लास्ट स्टेजला आल्यानंतर उपचार घेतात. अशा परिस्थितीत बरे होण्याची शक्यता देखील कमी असते. यात शरीरातील अनुवंशिक बदलांमुळे पेशी नियंत्रणाशिवाय वाढतात. पेशी जशा वाढतात तसे ते एका ट्युमरमध्ये रुपांतरीत होते. कालांतराने या पेशी शरीरात पसरतात. यामुळे धोका अधिक वाढतो. मागील १० वर्षांमध्ये भारतात ७० टक्के लोकं या गंभीर कर्करोगाशी दोन हात करीत आहे. त्यामुळे वेळेत लक्षणे ओळखणे यासह, सुरुवातीच्या स्टेजमध्ये उपचार घेणे आवश्यक.
सायन्स डायरेक्टमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, ''तोंडाच्या कर्करोगासाठी तंबाखूचे सेवन हे एक प्रमुख घटक आहे. गुटखा, जर्दा, खैनी, सिगारेट, बिडी, हुक्का या सर्व गोष्टींमुळे तोंडाचा कर्करोग होतो. तरुण आणि वृद्ध दोन्ही गटातील लोकं यामुळे बळी पडत आहे, त्यामुळे सुरुवातीची लक्षणे जाणवल्यास वेळीच उपचार घेणे आवश्यक''(Mouth cancer - Symptoms and causes).
व्हाइट पॅचेस
सुरुवातीच्या स्टेजमध्ये हिरड्या, जीभ, टॉन्सिलवर लाल किंवा पांढरे डाग दिसू लागतात. याला ल्युकोप्लाकिया असे म्हणतात. बहुतांश ल्युकोप्लाकिया पॅचेस कर्करोग नसतात. तर, काही चट्टे तंबाखूच्या अतिसेवनामुळे पडतात. जर असे चट्टे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक.
वारंवार गाठी उठणे
जर तोंडात किंवा लसिका ग्रंथीमध्ये कोणत्याही प्रकारची गाठ उठत असेल, तर ही धोकादायक बाब मानली जाते. आपल्याला जर घशात काहीतर अडकले आहे, असे जाणवत असेल. किंवा वारंवार घसा दुखत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गाठ उठल्यावर दुर्लक्ष करू नका.
सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्कीट खाता? आरोग्याच्या ५ समस्या हमखास छळतात, बघा तसेच होते का?
तोंड आणि चेहऱ्यावर वेदना आणि सुन्नपणा
कोणत्याही कारणाशिवाय, चेहऱ्यावर, तोंडात किंवा मानेमध्ये वेदना होत असतील आणि त्याभोवती सुन्नपणा जाणवत असेल तर, तर ते तोंडाच्या कर्करोगाचे लक्षणं असू शकतात. या स्थितीत, जबड्यात सूज आणि वेदना देखील उद्भवू शकते.
दात कमकुवत होणे
कोणत्याही कारणाशिवाय जर, दात कमकुवत होत असतील, तर हे कर्करोगाचे लक्षणं असू शकतात. याशिवाय जर तुम्ही दात काढला असेल, व त्या जागेवरचा खड्डा भरला नसेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तोंडाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी यासह अनेक मार्गांनी उपचार केले जातात. हे व्यक्तीचे वय, आरोग्य स्थिती आणि अवस्था यावर अवलंबून असते.