वेळेला चहा (Tea Making) सर्वांनाच लागतो. चहाशिवाय काहींची सकाळही होत नाही (Food). नियमित चहा प्यायल्याने काहींना दिवसभर फ्रेश वाटते (Health Tips). चहा करण्याची पद्धत प्रत्येकाची सारखीच असेल असे नाही. काही जण त्यात चहा मसाला, आलं घालतात. पण चहामध्ये कोणते पदार्थ घालू नये? याची माहिती आपल्याला आहे का?
चहा किंवा पोळी आपण नियमित खातो. पण त्यात कोणत्या गोष्टी घालू नये? अनेकदा नकळत आपण पदार्थात गोष्टी घालतो, यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चहा आणि कणकेत कोणत्या गोष्टी घालू नये? पाहूयात(Do you know, you should never combine these foods with Tea and Chapati).
हिवाळ्यात फक्कड चहा हवाय? त्यात घालं '१' पदार्थ; आरोग्य राहील सुदृढ; सर्दी - खोकलाही राहील दूर
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ रॉबिन शर्मा सांगतात, 'आयुर्वेदानुसार चहामध्ये अनेक घटक असतात. जे शरीरात विषासारखे कार्य करतात. याशिवाय चहामध्ये आपण अनेक गोष्टी घालतो. ज्यामुळे चहामध्ये असलेले पौष्टीक घटक नष्ट होत जाते.'
चहामध्ये काय घालू नये?
चहामध्ये दूध आणि साखर घातलीच जाते. त्याशिवाय चहा अपूर्ण आहे. पण चहामध्ये दूध आणि साखरेचं मिश्रण घालणं योग्य नाही. शिवाय साखर खाण्याचे काही दुष्परिणाम असल्यामुळे त्यात काही जण गुळ घालतात. पण यामुळे खराब पचन आणि मधुमेहाचा धोका वाढतो. चहासोबत नमकीन, समोसे किंवा चाट-पकोडी कधीही खाऊ नये.
वाटीभर मेथी दाण्यांचे करा पौष्टीक लाडू, कडू अजिबात होणार नाही; हिवाळ्यात दुखण्यांपासून राहाल लांब
कणकेत काय घालू नये?
चपाती आणि पराठ्याची चव वाढवण्यासाठी कणिक मळताना अनेक जण मीठ घालतात. मिठामुळे चपाती किंवा पराठ्याची चव वाढते. पण तज्ज्ञांच्या मते असे करू नये. कणकेत मीठ घालून पराठा कधीही करू नये. तसेच पॅकबंद पिठापासून बनवलेल्या पोळ्या बनवून खाऊ नका.
कोणत्या गोष्टी एकत्र खाऊ नये
हरभरा, गूळ, केळी आणि दूध कधीही एकत्र खाऊ नये. अनेकजण चण्यासोबत गुळ, केळी आणि दूध घालून शेक तयार करतात. जे आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत धोकादायक मानले जाते. यामुळे पोटाचे विकार वाढतात.