Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री जेवणच बंद केलं तर खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, रात्री जेवलाच नाहीत तर..

रात्री जेवणच बंद केलं तर खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, रात्री जेवलाच नाहीत तर..

Can you lose weight by not eating at Night रात्री जेवणच न करता उपाशी राहिलं म्हणजे आपलं वजन झरझर कमी होतं हे कितपत खरं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 05:04 PM2023-02-10T17:04:41+5:302023-02-10T18:09:57+5:30

Can you lose weight by not eating at Night रात्री जेवणच न करता उपाशी राहिलं म्हणजे आपलं वजन झरझर कमी होतं हे कितपत खरं?

Do you really lose weight if you stop eating at night? Experts say, if you don't eat at night.. | रात्री जेवणच बंद केलं तर खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, रात्री जेवलाच नाहीत तर..

रात्री जेवणच बंद केलं तर खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, रात्री जेवलाच नाहीत तर..

वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं खूप काही गोष्टी करतात. विविध व्यायाम आणि डाएटिंग फॉलो करून वजन कमी करण्याचे प्रयत्न करतात. बाहेरचं खाणं टाळतात, जे योग्य आहे. फास्ट फूडच्या सेवनामुळे वजन वाढतेच. मात्र, घरचे जेवण स्किप करणे कितपत योग्य आहे? काही लोकं वजन कमी करण्याच्या नादात सकाळचा नाश्ता अथवा रात्रीचं जेवण स्किप करतात. अनेकांना असे वाटते की, एकवेळचे जेवण स्किप केल्याने वजन कमी होते. परंतु, असे केल्याने खरंच वजन कमी होते का? वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण सोडणे गरजेचं आहे का?

यासंदर्भात डायटीशियन डॉक्टर स्नेहल अडसुळे यांनी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे, त्या म्हणतात, '' काही लोकं वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण कमी करतात. याने वजन कमी होण्यास मदत होईल. परंतु, तात्पुरतेच वजन कमी होईल. याचा दीर्घकालीन परिणाम शरीरावर होत नाही. बऱ्याच लोकांना असे वाटते की, जेवण स्किप केल्याने वजन नियंत्रणात येईल. परंतु, असे नाही पुन्हा जेवण सुरु केल्याने वजन वाढू शकते. प्रत्यक्षात, हा दृष्टीकोन केवळ एक भ्रम आहे.''

एकवेळच्या जेवणामुळे आपले शरीर उपासमारीच्या स्थितीत जाऊ शकते, असे करत राहिल्यास काहींचे याच्या उलट म्हणजे वजन देखील वाढू शकते. रात्रीचे जेवण स्किप केल्यास आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया.

रात्रीचे जेवण न करणे कितपत योग्य, शरीरावर याचे काय परिणाम होतो..

अन्न हे आपल्या शरीरासाठी हवे. याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. अन्नाचे पचन हे महत्वाचे आहे, याने मुख्य म्हणजे कॅलरी बर्न होते. नियमितपणे अन्न न खाल्ल्याने शरीराचा चयापचय दर कमी होतो.

जेवण सोडल्याने आपली इच्छा चटपटीत खाण्याच्या पदार्थांकडे वळते. यामुळे आपण जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड खाण्यास सुरुवात करतो. अशा परिस्थितीत बहुतेक जण हे जेवण वगळतात आणि अन्नाऐवजी चुकीचे पर्याय निवडतात.

रात्रीचे जेवण बंद म्हणजे वजन कमी, ही प्रोसेस चुकीची आहे. मात्र आपल्याला जर वजन कमी करायचे असेल तर यासाठी पहिली पायरी म्हणजे हा गैरसमज सोडणे. वजन कमी करण्यासाठी साधे आणि घरचे जेवण घ्या आणि शक्यतो बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळा. रात्रीचे जेवण स्किप करू नका, अन्न खा पण प्रमाणात खा. कारण रात्रीच्या समयी आपली हालचाल कमी असते.

Web Title: Do you really lose weight if you stop eating at night? Experts say, if you don't eat at night..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.