Join us   

थंड चहा पुन्हा गरम करून पिता? गंभीर आजार होण्याआधीच जाणून घ्या साईड इफेक्ट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 3:20 PM

Tea Lover Reheat Cold Tea सकाळ असो या संध्याकाळ चहा प्रेमींना चहा पिण्याचा मोह आवरत नाही. परंतु, थंड चहा गरम करून पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

भारतात पाण्यानंतर जास्त प्यायला जाणारा द्रव पदार्थ म्हणजे चहा. सकाळ असो या संध्याकाळ चहा प्रेमींना चहा पिण्याचा काळवेळ नसतो. पाऊस असो, थंडी असो, थकवा-डोकेदुखी असो किंवा आळस, या सगळ्या गोष्टीला एकच पर्याय म्हणजे चहा. साधारणपणे हिवाळ्याच्या काळात प्रत्येक कुटुंबात दोन ते तीन वेळा चहा बनवला जातो. या दरम्यान प्रत्येक घरात एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे लोक थंड चहा पुन्हा गरम करून पितात. असे करणे चुकीचे असून, ही बाब आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. थंड चहा पुन्हा गरम केल्याने आपल्या शरीराचे काय नुकसान होते ते जाणून घेऊया.

होतील हे आजार

चहा पुन्हा गरम करून प्यायल्यावर चहाचे सर्व गुणधर्म आणि चांगले संयुगे बाहेर येतात. थंड चहा पुन्हा गरम करून प्यायल्याने जुलाब, उलट्या, व पचनाच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. याचा थेट परिणाम शरीरावर होतो. यासाठी थंड झालेला चहा गरम करून पित असाल तर एकदा विचार करून प्या.

साठवलेल्या चहामध्ये बॅक्टेरिया जमा होतात

जर चहा जास्त बनवून दिवसभरात सारखं गरम करून पित असाल तर, चहामध्ये बऱ्याच प्रमाणावर बॅक्टेरिया जमा व्हायला सुरुवात होते. हे बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत चहा पुन्हा गरम करून पिणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

टॅनिन बाहेर पडते

चहा पुन्हा गरम करून प्यायल्यास टॅनिन बाहेर पडते. त्यामुळे चहाची चव कडू होते. अशा परिस्थितीत कडू चहा तुमच्या तोंडाची चव खराब तर करतेच, यासह तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवते.

हे लक्षात ठेवा

जर चहा बनवून फक्त 15 मिनिटे झाली असतील, तर आपण चहा गरम करून पुन्हा पिऊ शकता. रिकाम्या पोटी चहा कधीही पिऊ नये. कारण त्यामुळे आम्लपित्त होऊ शकते. जर आपल्याला सकाळी चहा पिण्याची सवय असेल, तर त्यासोबत काहीतरी हलके पदार्थ नक्कीच खा. फक्त चहा पिऊ नका.

टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइलआरोग्य