सरासरी आठ तास झाोप आवश्यकच असते. कमी झोप झाल्यानं अनेक आजार उद्भवतात. याचा थेट परिणाम आपल्या कामावर देखील होतो. मात्र, कधी कधी अधिक झोप देखील शरीरासाठी हानिकारक ठरते. जास्त झोपेमुळे शरीरातील उर्जाकमी होते. व्यक्ती शारीरिक आणि मानसिक द्रुष्ट्या खूप दुर्बल होतो. तज्ज्ञांच्या मते रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रोलिंगमुळे हायपरसोमनियाचा शिकार व्यक्ती होऊ शकतो. या आजारात आपले मेंदू झोपेवरील नियंत्रण सोडते. बऱ्याच संशोधनात असे दिसून आले आहे की मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश झोपेवर परिणाम करतो. त्याच वेळी, रात्री झोपताना अल्कोहोल, धूम्रपान आणि कॉफी प्यायल्याने झोप येत नाही. वारंवार झोप अपुरी होणे, आठ तासापेक्षा अधिक झोप लागणे, दिवसाही झोप लागणे याला हायपरसोमनिया म्हणतात. या आजारामध्ये व्यक्तीला झोप आवरणे होत नाही. रात्रीसह दिवसाही झोप लागते. हायपरसोमनियाचे लक्षणे काय, हायपरसोमनिया या आजारावर उपचार काय याविषयी ही चर्चा.
हायपरसोमनियाचे लक्षणे
भूक कमी लागणे
वारंवार झोप येणे
चीडचीड होणे
तणाव आणि नैराश्यात जगणे
स्मरण शक्ति कमजोर होणे
दिवसा बेचैनी आणि पॅनिक होणे
हायपरसोमनिया आजारावर उपचार
हायपरसोमनिया हा आजार आपल्याला आहे असे वाटल्यावर जवळच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावे. या आजाराशीनिगडीत जर काही औषध डॉक्टरांनी दिले, तर त्याचे सेवन कमी करावे कारण बहुतांशवेळी ते औषध आपल्या शरीरावर अधिक प्रभावी ठरू शकतात. यासह आपली झोपेची शैली आणि स्थान देखील बदला. संध्याकाळी अजिबात व्यायाम करू नका. तसेच, कॅफिनयुक्त पदार्थ आणि अल्कोहोल अजिबात सेवन करू नका.
डॉक्टरांचा सल्ला तर हवाच यासह लाईफस्टाईलमध्ये देखील करा हे बदल
वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या.
झोपण्यासाठी बेड स्वच्छ आणि खोलीचे वातावरण अनुकूल ठेवा.
चहा-कॉफीचे सेवन कमी करा, त्यांचा झोपेवर परिणाम होतो.
दारू आणि सिगारेटपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे
आयुर्वेदिक औषधे आपल्या समस्येवर नैसर्गिकरित्या मात करण्याचे काम करतात आणि त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.