तोंडात लाळ तयारण होणं ही सर्वसामान्य बाब आहे. पण जर दिवसभर तोंडात जास्त लाळ तयार होते, रात्री झोपेतही गळते याचा अर्थ जास्त लाळ स्त्रवण्यामागे आणि गळण्यामागे शारीरिक किंवा भीतीसारखं मानसिक कारण असतं. लाळ स्त्रवण्यामागील नेमक्या कारणाचा शोध लागल्यास लाळ कमी करण्यासाठीचे उपाय करता येतात. हे उपाय लाळ स्त्रवण्यामागचं नेमकं कारण समजलं की आपले आपणही करता येतात किंवा कारणं आणि उपाय या दोन्हींसाठी डाॅक्टरांची मदत लागते. लाळ स्त्रवण्याच्या कारणांमध्येच यावरचे उपायही दडलेले आहेत.
Image: Google
लाळ गळण्याची कारणं आणि उपाय
1. पाणी योग्य प्रमाणात न पिल्यानं तोंडात जास्त लाळ तयार होण्याची आणि रात्री झोपेतही लाळ गळण्याची समस्या निर्माण होते. संपूर्ण दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायलं जाणं अपेक्षित असतं. शरीरात जर पुरेसा ओलसरपणा निर्माण झालेला नसल्यास तोंडात जास्त प्रमाणात लाळ तयार होते. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायलं गेल्यास त्याचा परिणाम लाळेवर होतो. लाळ कमी प्रमाणात निर्माण होते. शरीरात ओलसरपणा राखण्यासाठी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्यायल हवं. जेवणाआधी आणि जेवण करताना मध्ये मध्ये गरम पाणी प्यावं. दिवसभरात तोंडं कोरडं पडण्याआधी किंवा तहान लागण्याआधी घोट घोट पाणी मधून मधून प्यायला हवं.
Image: Google
2. खूप आंबट आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास किंवा या चवीची पेयं जास्त प्रमाणात प्याल्यास या चवींची तीव्रता कमी करण्यासाठी तोंडात जास्त प्रमाणात लाळ तयार होते. त्यामुळे लाळ जास्त स्त्रवण्याच्या समस्येवर उपाय म्हणून आंबट गोड पदार्थ आणि पेयं जास्त प्रमाणात घेणं टाळायला हवं. आंबट आणि गोड पदार्थ आणि पेयांचं प्रमाण कमी केल्यास तोंडात कमी प्रमाणात लाळ तयार होते.
Image: Google
3. आपल्याला काही शारीरिक मानसिक समस्या जाणवत असल्यास , विशिष्ट औषधोपचार सुरु असल्यास तोंडात जास्त प्रमाणात लाळ स्त्रवते. लाळ जास्त स्त्रवण्याचं नेमकं कारण सापडत नसल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. डाॅक्टरांच्या मदतीनं लाळ जास्त स्त्रवण्याचं कारण शोधता येतं. जर एखाद्या आजारावरच्या औषधोपचारांनी जास्त लाळेची समस्या निर्माण झालेली असल्यास डाॅक्टर औषधोपचार बदलून देऊ शकतात. विविध प्रकारचे संसर्ग, विषाणू आणि गॅस्ट्रीक समस्या यामुळे लाळेची निर्मिती जास्त होते. तर ॲण्टिसायकोटिक औषधांमुळे जास्त लाव स्त्रवते.
4. अती प्रमाणात लाळ स्त्रवणे यालाच हायपर सिक्रेशन असं म्हणतात. यावर उपाय म्हणून अनेक औषधं उपलब्ध आहेत. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार लाळेवरची औषधं घेता येतात.