Join us   

तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाइल फोन घेऊन जाता? अमेरिकन अभ्यास सांगतो ही सवय फार घातक कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 1:32 PM

Here's why you should stop taking your Mobile phone to the loo सकाळी उठल्यापासून हातात स्मार्ट फोन आणि बिनकामाचे स्क्रोलिंग तब्येतीसाठी वाईटच..

काही वर्षांपूर्वी जगभरात स्मार्ट फोनची क्रांती झाली, आणि त्यानंतर मोबाईल, इंटरनेट, या गोष्टींनी आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका घेतली. आज आपल्या दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा अंत मोबाईल फोन पाहून होतो. बहुतांश लोकांचे मोबाईल फोनशिवाय पान हालत नाही. काही लोकं मोबाईलच्या एवढ्या अधीन गेले आहेत की, टॉयलेटमध्ये गेल्यावर देखील त्यांना फोन सोडवत नाही. स्मार्टफोन हे आपलं आयुष्य स्मार्ट करण्यासाठी केलेली एक सोय आहे. मात्र, त्याला त्याच दृष्टीने बघितले जात नाही. कोणत्या कामाला किती प्राधान्य द्यायचं हे आपण ठरवतो. आपल्या मोबाईलला सगळीकडे सतत सोबत ठेवणं हे कामाचं लक्षण नसून ते अस्थिर मनाचं लक्षण आहे.

यासंदर्भात अमेरिकेतील सॅनिटायझिंग कंपनी व्हायोगार्डने दावा केला की, ''७३ टक्के लोक वॉशरूममध्ये मोबाईल फोन वापरतात. ११ ते २६ वयोगटातील ९३ टक्के लोकांनी असे कबूल केले की, ते मोबाईल गेम खेळण्यासाठी किंवा चॅट करण्यासाठी वॉशरूममध्ये घेऊन जातात. मात्र, ही बाब धोकादायक असून, अशा परिस्थितीत ही सवय बदलायला हवी.''

शरीरावर काय परिणाम होतो?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ''लोक ज्या स्थितीत टॉयलेट सीटवर बसून शौच करतात, त्यामुळे त्यांच्या गुदद्वाराभोवती असलेल्या नसांवर दबाव पडतो. त्यामुळे त्यांना मुळव्याध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बराच वेळ बसून मोबाईल फोन स्वाइप किंवा स्क्रोल केल्याने खालील भागात खूप दुखणे किंवा खाज येण्याची समस्या निर्माण होते.''

काही टॉयलेट वाचकांच्या मते, वृत्तपत्र किंवा मोबाईल टॉयलेटमध्ये नेल्यावर त्यांना प्रेशर लवकर येतं, पण सर्वेक्षणात असे समोर आले की, प्रत्यक्षात या गोष्टींमुळे काहीच फरक पडत नाही.

मोबाईलपेक्षा एक वेळ वृत्तपत्र बरं असं काही डॉक्टर सांगतात, कारण ते रद्दीत टाकून दिलं जातं. मोबाईल बद्दल असं काही होत नाही. कारण टॉयलेटमधील काही किटाणू मोबाईलच्या स्क्रीनवर चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला विविध आजाराला सामोरे जावे लागते. पोट लवकर साफ करायचे असल्यास, सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावं असं डॉक्टर सांगतात.

टॅग्स : हेल्थ टिप्समोबाइलआरोग्य