हिवाळा सुरू झाला की शरीरातील अवयवांचे दुखणे देखील सुरू होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे विविध आजार उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण होते. कालांतराने या आजाराची लक्षणं मोठ्या आणि गंभीर आजारात रुपांतर करतात. अनेकांना पायांच्या संबंधित त्रास सुरू होतो. आज आपण अशा काही पायांशी संबंधित लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याकडे योग्य वेळी लक्ष दिले नाही तर तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
पायांना सूज येणे
पायांना दीर्घकाळ सूज येणे हे किडनीच्या आजाराचे किंवा अशक्तपणाचे लक्षण असू शकते. याशिवाय पायाच्या वेगवेगळ्या भागात दुखणे आणि सूज येणे, या तक्रारी देखील संधिवात किंवा हृदयाशी संबंधित आजाराकडे निर्देश करतात.
पायाचा रंग बदलणे
पायाचा रंग बदलणे हे गॅंग्रीन आजाराचे कारण असू शकते. या आजारात शरीरातील ऊती नष्ट होऊ लागतात. त्यामुळे जखमा होऊ लागतात आणि त्या सतत पसरत जातात.
पायात मुंग्या येणे
पायात मुंग्या येणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र हेच कारण भविष्यात तुमच्यासाठी गंभीर समस्या बनू शकते. यामागील कारण उच्च रक्तदाब असू शकते. या स्थितीत रक्ताभिसरण बिघडू लागते. त्यामुळे पायात मुंग्या येणे सुरू होते. त्याचबरोबर शरीरात व्हिटॅमिन डी आणि ईच्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
पाय दुखणे
अनेकांना पाय दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. रक्ताभिसरण वाढले तरी संपूर्ण पाय दुखण्याची तक्रार असते, आणि सांधेदुखीचा त्रास होतो.
पाय सुन्न होणे
नसा कमकुवत असल्यास किंवा मधुमेह असल्यास पाय सुन्न होऊ शकतात. या काळात तेलकट पदार्थांचे सेवन टाळा. आणि भरपूर चाला.