Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आठवड्यात 'या' दिवशी तुम्हालाही येऊ शकतो हार्ट ॲटॅक; डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितलं कारण..

आठवड्यात 'या' दिवशी तुम्हालाही येऊ शकतो हार्ट ॲटॅक; डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितलं कारण..

Madhuri Dikshit Husband Doctor Shriram Nene : अनेक रिसर्चमधून याचा खुलासा झाला आहे की आठवड्याच्या इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारी हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 02:16 PM2024-07-17T14:16:34+5:302024-07-17T20:25:23+5:30

Madhuri Dikshit Husband Doctor Shriram Nene : अनेक रिसर्चमधून याचा खुलासा झाला आहे की आठवड्याच्या इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारी हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो.

Doctor Shriram Nene Shares That Risk Of Heart Attacks Are Higher In Monday Reason Reveal | आठवड्यात 'या' दिवशी तुम्हालाही येऊ शकतो हार्ट ॲटॅक; डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितलं कारण..

आठवड्यात 'या' दिवशी तुम्हालाही येऊ शकतो हार्ट ॲटॅक; डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितलं कारण..

प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit Nene) पती डॉ.  श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) हे प्रसिद्ध कार्डिओथोरोसिक सर्जन आहेत. ते आपल्या इंस्टाग्राम पेजवर नेहमीच वेगवेगळे आरोग्याशीसंबंधित माहिती शेअर करत असतात. डॉ. श्रीराम नेने यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टनुसार  सोमवारी सकाळी हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याचा धोका जास्त असतो. अनेक रिसर्चमधून याचा खुलासा झाला आहे की आठवड्याच्या इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारी हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो. (Doctor Shriram Nene Shares That Risk Of Heart Attacks Are Higher In Monday Reason Reveal)

डॉ. नेने सांगतात की सोमवारी हार्ट अटॅक येण्याची ठोस कारण माहित नसले तरी यामागे अनेक छोटी कारणं असू शकतात.  यातील एक कारण सर्काडियन रिदम असू शकते. ज्यामुळे आपली झोपण्याची आणि उठण्याची सायकल सुरळीत होते. एक्सपर्ट्सच्यामते झोपण्याची आणि उठण्याची सायकल प्रभावित झाल्याने तुमच्या तब्येतीवर याचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे तब्येतीवर गंभीर परिणाम होतो. अशा स्थितीत काही हॉर्मोन्स सर्काडियन रिदमने झोपण्याची आणि उठण्याची सायकल प्रभावीत झाल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका उद्भवू शकतो.

डॉ. नेने यांच्या आधीही सोमवारी हार्ट अटॅक येण्याबाबत चर्चा झाली होती. याआधी ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या रिपोर्टमध्येदावा करण्यात आला होता की सोमवारी हार्ट अटॅक येण्याचा धोका १३ टक्के जास्त असतो म्हणून याला ब्लू मंडे असंही म्हणतात. सोमवारी सकाळी ६ ते ८ च्या दरम्यान हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो. याची कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. फक्त अनुमान असे लावण्यात आले आहे की सकाळी उठल्यानंतर ब्लड कोर्टिसोल आणि हॉर्मोन जास्त वाढतात.  म्हणूनच सायकल योग्य असायला हवी. उठण्याआधीच्या झोपण्याच्या बदलाचा आरोग्यावर परिणाम होतो.

सोमवारी हार्ट अटॅक का येतो?

डॉक्टर नेने सांगतात की विकेंडला बरेच लोक आपला आवडता शोव्ह बघतात किंवा मित्रमैत्रिणींसोबत पार्टिमध्ये जातात. या कारणामुळे झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेवर परिणाम होतो आणि सर्काडियन रिदममध्ये बदल झाल्याने रविवारी रात्री झोपेची कमतरता उद्भवते. ज्याला सोशल जेट लॅग असंही म्हटलं जातं. झोपेची कमतरता किंवा झोप पूर्ण न होणं यामुळे ब्लड प्रेशर आणि कोर्टिसोल लेव्हल वाढते ज्यामुळे हार्ट अटॅक येतो. 

Web Title: Doctor Shriram Nene Shares That Risk Of Heart Attacks Are Higher In Monday Reason Reveal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.