Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कफ सिरपवर पाणी प्यायल्यानं काय नुकसान होतं? ऐका डॉक्टर काय म्हणाल्या!

कफ सिरपवर पाणी प्यायल्यानं काय नुकसान होतं? ऐका डॉक्टर काय म्हणाल्या!

कप सिरपचा वापर योग्य पद्धतीनं केला तर याचा यानं नक्कीच फायदा मिळतो. पण काही लोक कफ सिरप पिताना एक चूक करतात. ही चूक करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:39 IST2024-12-31T13:38:40+5:302024-12-31T13:39:57+5:30

कप सिरपचा वापर योग्य पद्धतीनं केला तर याचा यानं नक्कीच फायदा मिळतो. पण काही लोक कफ सिरप पिताना एक चूक करतात. ही चूक करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. 

Doctor tells side effects of drinking water after consuming cough syrup | कफ सिरपवर पाणी प्यायल्यानं काय नुकसान होतं? ऐका डॉक्टर काय म्हणाल्या!

कफ सिरपवर पाणी प्यायल्यानं काय नुकसान होतं? ऐका डॉक्टर काय म्हणाल्या!

Side Effects of Drinking Water After Consuming Cough Syrup : सर्दी-खोकला बरा करण्यासाठी बरेच लोक वेगवेगळे घरगुती उपाय करतात. अनेक लोक घरात कफ सिरपही स्टोर करून ठेवतात. कफ सिरपनं खोकला बरा होण्यास मदत मिळते. कप सिरपचा वापर योग्य पद्धतीनं केला तर याचा यानं नक्कीच फायदा मिळतो. पण काही लोक कफ सिरप पिताना एक चूक करतात. ही चूक करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. 

कफ सिरप प्यायल्यानंतर पाणी पिणं टाळलं पाहिजे. असं केल्यास अनेक नुकसान होतात. कफ सिरप प्यायल्यानंतर पाणी पिल्यानं कफ आणखी जास्त वाढतो. अशात डॉक्टर कनिका पोपली यांनी असं केल्यावर काय नुकसान होतात याबाबत सांगितलं आहे.

कफ सिरप प्यायल्यावर पाणी का पिऊ नये?

डॉ. कनिका पोपली यांच्यानुसार, कफ सिरप प्यायल्यानंतर पाणी पिण्याची चूक आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. कफ सिरपमध्ये डेक्सट्रोमेथोरफॅन तत्व आढळतं. जे कफाला दाबण्याचं काम करतं. यात Acetaminophen सुद्धा असतं. ज्यानं छोट्या-मोठ्या वेदना दूर करण्यास मदत मिळते. तसेच कफ सिरपमध्ये ग्लिसरीन, मध आणि काही असे तत्व असतात, ज्यामुळे कफची निर्मिती कमी होते. अशात जेव्हा तुम्ही कफ सिरपवर पाणी पिता तेव्हा त्याचा प्रभाव कमी होतो. 

कफ सिरपवर पाणी पिण्याचं नुकसान

कफ सिरफवर पाणी प्यायल्यानं अनेक नुकसान होतात. कफ सिरप प्यायल्यावर पाणी प्यायल्यानं कफ आणखी घट्ट होतो. अशात खोकला कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकतो. अनेक चक्कर येणं किंवा मळमळही वाटू शकतं. कफ सिरप प्यायल्यानंतर कमीत कमी १० ते २० मिनिटांनंतर पाणी प्यावं.

Web Title: Doctor tells side effects of drinking water after consuming cough syrup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.