Join us

काहीही खाल्ल्यावर लगेच पोट फुगतं? डॉक्टरांनी सांगितले ३ उपाय, लगेच वाटेल हलके...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:41 IST

Bloating Cause : ब्लोटिंग म्हणजेच फुगण्याची समस्या कधी कधी होत असेल तर सामान्य बाब आहे. पण जर नेहमीच काही खाल्ल्यावर पोट फुगत असेल तर ही चिंताजनक बाब असू शकते.

Bloating Cause : काहीही खाल्लं की पोट फुगण्याची समस्या झाल्याची तक्रार अनेकजण सतत करत असतं. ब्लोटिंग म्हणजे पोट फुगणं ही एक कॉमन समस्या आहे जी अनेकांना नेहमीच होते. पोट फुगलं की मग व्यक्ती शांतपणे एका जागेवर बसू शकत नाही. कारण यामुळे अस्वस्थ वाटतं. जास्त काही खाल्लं, तळलेले पदार्थ खाल्ले तर पोट फुगण्याची समस्या होते. ब्लोटिंग म्हणजेच फुगण्याची समस्या कधी कधी होत असेल तर सामान्य बाब आहे. पण जर नेहमीच काही खाल्ल्यावर पोट फुगत असेल तर ही चिंताजनक बाब असू शकते.

हेल्थ इन्स्टिट्यूटचे फाउंडर डॉ. जोश एक्स यांनी याबाबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यानी सांगितलं की, जर काही जड किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यावर नेहमीच पोट फुगत असेल तर याकडे दुर्लक्ष करणं चांगलं नाही. हा तुमचं पचन तंत्र किंवा हार्मोन असंतुलित होण्याचा संकेत असू शकतो. ही समस्या दूर करण्यासाठी ३ गोष्टी कराव्या लागतील.

योग्य नाश्ता

सकाळचा नाश्ता हा खूप महत्वाचा असतो. नाश्त्यात स्टार्ची कार्ब्स खाऊ नका. यात प्रोटीनचा समावेश करा, ज्यानं आतड्या चांगल्या राहतील. नाश्त्यात २० ग्रॅम कोलेजन बेस्ड  प्रोटीन आणि २० ग्रॅम प्लांट प्रोटीन ठेवा. यानं ब्लड शुगर बॅलन्स करण्यास, डायजेशन वाढवण्यास आणि ब्लोटिंग करण्यास मदत मिळेल.

काय खाल याचा प्लान

काहीही खाल्ल्यावर सतत ब्लोटिंग होत असेल आणि ही समस्या दूर करायची असेल तर आधी हे ठरवा की, काय खायचं आहे. जेवणात सूप, शिजवलेल्या भाज्या यांचा समावेश करू शकता.

हर्बल टी

कॅमोमाइल, बडीशेप, पदीना आणि आल्याचा चहा प्या. या चहांनी पचन तंत्र नॅचरल पद्धतीनं शांत राहतं. दिवसातून ३ कप यापैकी कोणताही चहा प्याल तर ब्लोटिंगची समस्या होणार नाही.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य