Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने हिमोग्लोबिन वाढते? नक्की खरं काय? अभ्यास सांगतो..

लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने हिमोग्लोबिन वाढते? नक्की खरं काय? अभ्यास सांगतो..

Does Cooking in Cast Iron Help Iron Deficiency? : लोखंडी कढईत स्वयंपाक केल्याने हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते? असे म्हणतात; हे कितपत खरं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2024 04:10 PM2024-03-22T16:10:13+5:302024-03-22T16:11:14+5:30

Does Cooking in Cast Iron Help Iron Deficiency? : लोखंडी कढईत स्वयंपाक केल्याने हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते? असे म्हणतात; हे कितपत खरं?

Does Cooking in Cast Iron Help Iron Deficiency? | लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने हिमोग्लोबिन वाढते? नक्की खरं काय? अभ्यास सांगतो..

लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने हिमोग्लोबिन वाढते? नक्की खरं काय? अभ्यास सांगतो..

निरोगी राहण्यासाठी योग्य पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी सकस आहार घेणं गरजेचं (Health Care). पोषणतज्ज्ञ लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. त्याच वेळी, काही लोकांचा असा विश्वास आहे की स्वयंपाकाची भांडी देखील पौष्टिक गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात (Iron Deficiency).

असे म्हणतात की लोखंडाच्या भांड्यात अन्न शिजवल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. पण यामुळे खरंच शरीराला आयर्न मिळते का?(Does Cooking in Cast Iron Help Iron Deficiency).

लोखंडी भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे

एनसीबीआयच्या अहवालानुसार, लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवल्याने लोहाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे ॲनिमियाचा धोका कमी होतो. जर आपल्याला ॲनिमियाचा त्रास असेल तर, लोखंडी भांड्यात शिजवलेले अन्न खा. रिपोर्टनुसार, यात चार स्टडी करण्यात आले आहे. ज्यात लोखंडाच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि इतर गंभीर आजारांचा धोका कमी होतो, असे सांगण्यात आले आहे.

कलिंगड चिरण्याची सोपी- झटपट पद्धत, कलिंगडाच्या रसाळ फोडी आणि बियाही निघतील पटापट

कारण जेव्हा आपण लोखंडी भांडयामध्ये अन्न शिजवतो, तेव्हा लोखंड आणि हवेतील प्राणवायूची प्रक्रिया होऊन आयर्न ऑक्साईड तयार होते. जे पदार्थात मिसळते. जर आपल्याला ॲनिमियाच्या समस्येवर मात करायची असेल तर, लोखंडाच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवून खा.

सतत लोखंडी भांड्याचा वापर टाळा

अति तेथे माती ही म्हण प्रत्येक गोष्टीत लागू होते. जर आपण सतत लोखंडी भांड्यात अन्न शिजवून खाल तर, त्याचा दुष्परिणाम आरोग्याला सहन करावा लागतो. शिवाय लोखंडी भांड्यात शिजवलेले अन्न बराच वेळ ठेवून खाल्ल्याने लोहाची मात्रा धोकादायक पातळी ओलांडते. ज्यामुळे आरोग्याला फायदा नसून नुकसान देखील  होऊ शकते.

माधुरी दीक्षितचं पाहा सिक्रेट, सुंदर केसांसाठी सोपा उपाय- एक केळं आणि..

हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या गोष्टी खा

रक्तात जर हिमोग्लोबिनची कमतरता झाली तर अॅनिमियासारखा आजार होतो. त्यामुळे आयर्नयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खा. शिवाय जीवनशैलीकडेही लक्ष द्या. 

Web Title: Does Cooking in Cast Iron Help Iron Deficiency?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.