वाईट जीवनशैलीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होते. योग्य आहार न घेणे, शरीराची हालचाल कमी होणे, फास्ट फूडचे सेवन करणे, या कारणामुळे शरीरात विविध आजार उद्भवतात. मुख्य म्हणजे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम, आहारातून साखर व मीठ, हे पदार्थ वगळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. सध्या सॉल्ट फ्री (Salt-Free) डाएट ट्रेण्डींगमध्ये आहे. वजन कमी करण्यासाठी, मीठ सोडण्याचा किंवा कमीतकमी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण खरंच याने वजन कमी होतं का?
यासंदर्भात, आहारतज्ज्ञ राधिका गोयल यांनी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ज्यात तिने मीठ सोडल्याने खरंच वजन कमी होते का? याबाबतीत माहिती दिली आहे(Does Cutting Down on Salt Promote Weight Loss).
तज्ज्ञांच्या मते, ''मीठ कमी केल्याने किंवा पूर्णपणे सोडून दिल्याने वजन कमी होत नाही. शरीराचे कार्य व्यवस्थित चालवण्यासाठी आहारात मीठ असणे गरजेचं आहे. मीठामध्ये सोडियम जास्त प्रमाणात आढळते. आपण जर मीठ जास्त प्रमाणात खात असाल तर, शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. ज्यामुळे वजन काही ग्रॅमने वाढू शकते. मीठ सोडल्याने जर वजन कमी होत असेल, तर ते कमी कालावधीसाठीच असते.''
बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ३ पांढरे पदार्थ, कितीही चमचमीत असले तरी पोटात गेले की छळणारच..
सॉल्ट फ्री डाएट किती फायदेशीर आहे?
मीठ कमी करून वजन कमी होत असेल तर, ही स्थिती जास्त काळ टिकत नाही. वजन जर कमी झाले असेल तर, आपल्या आहारातून मिठाचे सेवन कमी किंवा वगळावे लागेल. जर आपण पुन्हा मीठ खाण्यास सुरुवात केली तर, पुन्हा वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रोज खा १ चमचा पांढरे तीळ, ४ फायदे - आजार टाळा आणि मिळवा भरपूर एनर्जी
वजन कसे कमी करावे?
मीठ खाल्ल्यास वजन वाढत नाही. मिठामुळे फक्त वॉटर वेट वाढते. जे वर्कआउट केल्याने कमी होते. खारट पदार्थांमध्ये भरपूर कॅलरीज आणि फॅट्स असतात, ज्यामुळे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी सकस आहार व कॅलरीज इनटेक कमी करायला हवे. ज्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते.