Join us   

दूध प्यायल्याने ॲसिडिटी कमी होते की वाढते? तज्ज्ञ सांगतात, पित्त झाल्यावर दूध टाळा कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 1:26 PM

Does drinking milk reduce or increase acidity Experts says : ॲसिडिटीची समस्या असेल तर थंड दूध प्यावे. यामुळे ॲसिडिटीची समस्या दूर होते.

दूध पिणं तब्येतीसाठी उत्तम असतं. यातील कॅल्शियम हाडांना मजबूती देण्याचं काम करते. जे लोक नियमित दूध घेतात त्यांना हाडांच्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. याव्यतिरिक्त दुधात अनेक पोषक तत्व असतात. काही लोक थंड दूध घेतात तर काहीजणांना गरमागरम दूध घ्यायला आवडतं. दूध प्यायल्यानं एसिडिटीची समस्या वाढते की कमी होते याबाबत अनेक समज  गैरसमज प्रचलित आहेत. (Does drinking milk reduce or increase acidity Experts advice)

अनेकदा तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की ॲसिडिटीची समस्या असेल तर थंड दूध प्यावे. यामुळे ॲसिडिटीची समस्या दूर होते. असे मानले जाते की दुधामध्ये आढळणारी अल्कली पोटात तयार होणारे अतिरिक्त ऍसिड काढून टाकते. यामुळे ॲसिडिटीशी संबंधित समस्या दूर होते.

तज्ज्ञ सांगतात दुध प्यायल्यानंतर लगेच आराम मिळतो पण दूध हे ॲसिडिटीवरचं  कायमचा उपाय नाही. काहीवेळानंतर परत ॲसिडिटी होते. यातील फॅट्स आणि प्रोटीन्स एसिड्स उत्सर्जन वाढवतात आणि यामुळे समस्या अधिक वाढू शकते. याशिवाय पोट आणि घश्यात जळजळीची समस्या उद्भवते.

कायम तरूण राहण्यासाठी करायच्या ५ गोष्टी, अमेरिकन डॉक्टरांचं सिक्रेट- खरं वय ऐकाल तर चकीत व्हाल!

 या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी अन्य उपाय तुम्ही करू शकता. बाजारातून एंटासिड घ्या. याव्यतिरिक्त मूळा, ताकाचे सेवन करा. आपण राहणीमान, खाण्यापिण्यात सुधारणा करा. जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणं टाळा. 

आरोग्य हेल्थ सेंटरचे आहारातज्ज्ञ डॉ. एस के पांडे यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना सांगितले की, ॲसिडिटीच्या समस्येत अशा पदार्थांचे सेवन करू नये जे पचायला बराचवेळ लागतो.  हाय फायबर्सयुक्त पदार्थांचे सेवन करावे. गरम दूध पिण्याऐवजी तुम्ही थंड दूधाचे सेवन  करू शकता. दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.यामुळ पीएच बॅलेंस व्यवस्थित राहतो आणि  एसिड रिफ्लेक्सपासून सुटका मिळते. ॲसिडिटी असल्यावर तुम्ही ठंड दूध पिऊ शकता पण यात कोणतेही पदार्थ एकत्र करू नका.

टॅग्स : दूधहेल्थ टिप्सआरोग्य