Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये? डायबिटीस होण्याचा धोका त्याने वाढतो का?

गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये? डायबिटीस होण्याचा धोका त्याने वाढतो का?

Does drinking water after eating sweets cause diabetes? मधुमेह असूनही मिठाई खात असाल तर, लगेच पाणी पिणे टाळा, अन्यथा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2023 03:41 PM2023-09-06T15:41:56+5:302023-09-06T15:42:59+5:30

Does drinking water after eating sweets cause diabetes? मधुमेह असूनही मिठाई खात असाल तर, लगेच पाणी पिणे टाळा, अन्यथा..

Does drinking water after eating sweets cause diabetes? | गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये? डायबिटीस होण्याचा धोका त्याने वाढतो का?

गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये? डायबिटीस होण्याचा धोका त्याने वाढतो का?

कळत - नकळत घडणाऱ्या चुकांमुळे जीवनशैलीमध्ये अनेक बदल घडतात. ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, यांसारखे गंभीर आजार निर्माण होतात. मधुमेहग्रस्त रुग्णांचे प्रमाण भारतातचं नव्हे तर, जगभरात वाढत चालले आहे. मधुमेह हा असा आजार जो जीवनभर आपला पाठलाग सोडत नाही. मधुमेह या आजारावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी गोड पदार्थ टाळण्यास तज्ज्ञ सांगतात.

अनेकांना गोड पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. पण असे करणं किती योग्य? गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ब्लड शुगरची लेव्हल वाढते का? डायबिटिजग्रस्त रुग्णांनी गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये? यासंदर्भात, आहारतज्ज्ञ रोहित यादव यांनी माहिती दिली(Does drinking water after eating sweets cause diabetes?).

टाईप - २ मधुमेहग्रस्त रुग्णांना धोका अधिक

आहारतज्ज्ञांच्या मते, ''जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर, त्यांनी गोड पदार्थ खाणे टाळावे. जर क्वचित आपण गोड पदार्थ खात असाल तर, लगेच पाणी पिणे टाळावे. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. कारण शरीरात पाण्यासोबत ग्लुकोज झपाट्याने शोषले जाते. त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते.

तासंतास बसून काम करताय? बैठ्या जीवनशैलीमुळे पोट - कंबर सुटले? ५ उपाय - वजन वाढणार नाही...

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये?

तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे, आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. पाण्यामुळे शरीरात ग्लुकोज झपाट्याने शोषले जाते. अशा वेळी साखरेची पातळीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. साधारण ३० मिनिटानंतर पाणी प्यावे. शक्य असल्यास १ तासानंतरही आपण पाणी पिऊ शकता.

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची इच्छा झाल्यास काय करावे?

- मिठाई खाल्ल्यानंतर काहीतरी थोडे नमकीन पदार्थ खा. यामुळे पाणी पिण्याची इच्छा कमी होईल.

- गोड पदार्थ खाल्ल्यानंतर पाण्याच्या गुळण्या करा.

सकाळी ब्रशही न करता पाणी पिणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञ सांगतात, काय खावे-प्यावे आणि कधी?

- जर आपल्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर, अशावेळी आपण फळे खाऊ शकता.

- जर आपल्याला मिल्क शेक किंवा कोल्ड कॉफी पिण्याची इच्छा झाली असेल तर, त्याजागी फळांचा ज्यूस प्या.

Web Title: Does drinking water after eating sweets cause diabetes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.