Join us   

खरेच चपाती खाल्ल्याने वजन वाढते का? वेट लॉससाठी चपाती खाणे बंद करावे का, तज्ज्ञ काय सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 12:55 PM

Chapati Weight Gain वजन कमी करताना चपाती खावी की नाही, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. आहारतज्ज्ञांकडून चपाती खाण्याचे फायदे आणि पोषक तत्वे जाणून घ्या ..

वजन कमी करण्याचा विचार जेव्हाही मनात येतो, तेव्हा पहिल्यांदा भात आणि चपाती बंद करण्यास प्रत्येक जण सांगत असतो. कारण या दोन्ही पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असते, आणि प्रोटीनचं प्रमाण खूप कमी असते. आपल्या शरीरासाठी प्रोटीन, फैट आणि कार्बोहाइड्रेट खूप महत्त्वाचं आहे. शरीराला इतर कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते. जी आपल्याला अन्नामधून मिळते. कार्बोहायड्रेटची गरज भागवण्यासाठी आपण आहारात चपाती आणि भाताचा समावेश करतो. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे ते अनेकदा त्यांच्या आहारातून कर्बोदके कमी करतात आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवतात. डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट रिचा यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी चपाती खाण्याचे काय फायदे आहेत ते सांगितले आहे.

चपातीत असतात इतके कॅलरीज

डॉ. रिचा यांनी सांगितले की, "एक मध्यम आकाराच्या चपातीत सुमारे ४० ग्रॅम असते. यासह 120 कॅलरीज असतात. आपण चपातीनुसार कॅलरीज मोजू शकता. दोन चपात्या म्हणजे २४० कॅलरीज. तीन चपाती म्हणजे गहू किंवा मल्टीग्रेन चपाती खाल्ल्यास 360 कॅलरीज. याचा देखील फायदा आपल्या शरीरासाठी होतो.

इतर कर्बोदकांपेक्षा उत्तम

ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा कमी कॅलरीजयुक्त आहाराचे सेवन करायचे आहे. त्यांच्यासाठी चपाती हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे प्रमाणात जर चपाती खाल तर त्याचा दुष्परिणाम होणार नसून, चांगले फायदे शरीरात होतील.

ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी

मल्टीग्रेन चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ग्लायसेमिक इंडेक्सयुक्त अन्न, साखरेची पातळी वाढवत नाही. मधुमेह रुग्णांसाठी मल्टीग्रेन चपात्या खूप फायदेशीर ठरतील.

अँटिऑक्सिडंटने समृद्ध

चपातीमध्ये व्हिटॅमिन बी१ असते. हे एक अँटी-ऑक्सिडेंट आहे, जे शरीरातून फ्री रॅडिकल्स कमी करतात. 

फायबरचा फायदा

चपात्यांमध्ये इतर कार्बोहायड्रेट पदार्थांपेक्षा जास्त फायबर असते. यामुळे पोट दिवसभर भरलेले असते. मुख्य म्हणजे चपाती खाल्ल्याने पचनाचा त्रास होत नाही.

मल्टीग्रेन्सचे पोषण

जर आपण बाजरी, हरभरा, डाळ आणि गहू एकत्र करून मल्टीग्रेन चपात्यांचा आहारात समावेश केला तर, कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि पोषणही मिळते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स