Join us   

भराभरा जेवल्यानेच वजन वाढतं, पोट सुटतं! १ घास ३२ वेळा चावून खा, तरच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 11:21 AM

Does Eating Fast Make You Gain More Weight? जे भरभर जेवतात, त्यांचं वजनही वाढतं-पोटही बिघडतं, तुमचं असं काही होतंय का?

अन्न सावकाश आणि चघळत खायला हवे, असे आपण आपल्या वडिलधाऱ्यांकडून अनेकदा ऐकले आहे. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात बहुतेकांना वेळेवर जेवण करायला मिळत नाही. अशा स्थितीत लोकं पटापट जेवण आटोपण्याचा प्रयत्न करतात. अन्न ३२ वेळा चावून खाण्याचा सल्ला आपल्याला अनेकांनी दिला असेल. पण अन्न भरभर न खाता, ३२ वेळा चावून का खावे?

यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ निखिल वत्स सांगतात, ''निरोगी आरोग्य जगण्यासाठी २५ ते ३० मिनिटात जेवण करायला हवे. एक घास साधारणपणे २५ ते ३२ वेळा चघळून खायला हवे. भरभर अन्न खाण्याचे अनेक तोटे आहेत. त्यामुळे वेळ काढून जेवण करायला हवे''(Does Eating Fast Make You Gain More Weight?).

भरभर अन्न खाण्याचे तोटे

१. जर आपण भरभर, कमी वेळात जेवण पूर्ण करत असाल तर, घास घशात अडकण्याची शक्यता निर्माण होते. काही वेळेला घास श्वास नलिकेमध्ये देखील अडकण्याची भीती असते. ज्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

२. जर आपण भरभर अन्न खात असाल तर, त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे अन्न चघळून खा, अन्न पूर्ण चघळल्यानंतर पचनसंस्थेचे काम खूप सोपे होते.

दही-कांदा एकत्र खावा का? दह्यात कांदा घालून खाल्ला तर पचन बिघडतं की सुधारतं?

३. भरभर अन्न खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता, गॅस, छातीत जळजळ, ऍसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. अन्न नीट चघळून खाल्ल्याने पोटाला त्रास होत नाही.

४. फास्ट ईटर बनण्याचा आणखी एक तोटा आहे. भरभर अन्न खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. पोट आणि कंबरेचा भाग वाढत जातो.

५. भरभर अन्न खाल्ल्याने शरीरात मधुमेहाचा धोका वाढतो. कारण या सवयीमुळे इन्शुलिनचे प्रभाव कमी होते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते.

साखर खाणंच बंद केलं तर? महिनाभरात तब्येतीत दिसतील ५ बदल, करुन तर पाहा

६. भरभर खाण्याच्या वाईट सवयीमुळे आपण मेटाबॉलिक सिंड्रोमचाही बळी होऊ शकता, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणाबाहेर जाते, यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न