महाराष्ट्रात तिखट - मसालेदार खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खवय्यांना तिखट खाल्ल्याशिवाय जमत नाही. काही जण पदार्थात कमी तिखट असल्यामुळे खाणं टाळतात. जर पदार्थ झणझणीत असेल तर, काही मिनिटात फस्त होते. पण तिखट खाणं आपल्या शरीरासाठी किती योग्य आहे? तिखट खाण्याचे फायदे आणि तोटे किती? काही लोकं असेही म्हणतात की, जास्त तिखट खाल्ल्याने रागही तितकाच जास्त येतो. हे नेमकं खरं की खोटं?
यासंदर्भात, हैदराबादमधील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे सहाय्यक प्राध्यापक तनुका घोषाल सांगतात, ''मसालेदार किंवा जास्त तिखट खाल्ल्याने राग वाढतो असे नाही. मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचा सक्रिय घटक असतो, जे निरोगी शरीरात अनेक समस्या वाढवू शकतात. कॅप्सेसिनच्या अतिप्रमाणामुळे आतड्यातील रक्त प्रवाह उत्तेजित होते. याव्यतिरिक्त, श्लेष्माचे उत्पादन देखील वाढू शकते. अतिप्रमाणात तिखट खाल्ल्याने अनेकदा जुलाबाचा त्रास होतो. यासह चिडचिडेपणा देखील वाढू शकते''(Does spicy food make you more aggressive? ).
रात्रीचे जेवण बंद केल्यानं खरंच वेटलॉस होतो? जेवण बंद करुनही वजन वाढले तर?
तिखट खाण्याचे तोटे
कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केली तर, त्याचे दुष्परिणाम हे छळतात. त्याचप्रमाणे जास्त तिखट खाणे देखील आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. ज्या लोकांना आधीच आतड्याच्या समस्या, पित्ताचा त्रास, पोटाचे विकार, अॅसिडिटी असेल त्यांनी आहारात तिखटाचे प्रमाण कमी करावे. गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध मंडळींनी आहारात तिखट पदार्थ खाऊ नयेत. कारण यामुळे पचनशक्तीवर दुष्परिणाम होऊ शकते.
रात्री गॅसेसचा खूप त्रास होतो? झोप लागत नाही? ३ उपाय, पोट सांभाळा
तिखट खाण्याचे फायदे
लाल तिखटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, प्रोए व्हिटॅमिन आणि भरपूर अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. जर आपल्याला आपले पचन वाढवायचे असेल तर. लाल मिरची एक चांगला उपाय आहे. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.