आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा समतोल राखणे गरजेचं आहे. व्यक्तीच्या आयुष्यात दैनंदिन सवयी चांगल्या असणे अत्यंत महत्वाचे आहे. पुस्तकी ज्ञान हे असायलाच हवे. मात्र, चारचौघात वावरताना व्यक्तिमत्व अधिक प्रभाव टाकते. त्यातल्या त्यात शारीरिक स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा अनेकांना महागात पडू शकते. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीवर आपला खराब इम्प्रेशन पडतो. अशा वाईट इंम्प्रेशन पाडणाऱ्या सवयी टाळणे गरजेचे आहे.
बहुतांश वेळा आपल्या वाणीवरून लोकांवर प्रभाव पडतो. मात्र, बोलताना काहींच्या तोंडातून दुर्गंधी निघते. अशा परिस्थितीत आपले इम्प्रेशन डाऊन होते. आपण कितीही फॅशनेबल कपडे घातले, चांगला मेकअप केला, पण तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल, तर त्या सगळ्या थाटाला काहीच अर्थ उरत नाही. लोक सहाजिकच तुमच्यापासून दूर पळायला लागतील. जर या समस्येपासून सुटका हवी असल्यास काही घरगुती उपाय करून पाहा. आपल्या नक्कीच कामी येतील.
तोंडातून दुर्गंधी का निघते?
बरेच लोक या समस्येने ग्रासलेले असतात. तोंडावाटे वास येण्याची अनेक कारणे आहेत. वेळेवर ब्रश न करणे, अधिक मसालेदार खाणे, कांदा - लसणाचा जेवणात अधिक वापर करणे, दारू - गुटखा - तंबाखूचे सेवन करणे. कारण आपण दिवसभारत अनेक गोष्टी खात असतो. त्यामुळे देखील तोंडाकडून दुर्गंधी निघते.
ग्रीन टी
ग्रीन टी सहजा वजन कमी करणारे लोकं पितात. परंतु, तोंडातील दुर्गंधी काढण्यासाठी देखील वापर केला जाऊ शकतो. यासाठी ग्रीन टीने गुळण्या करा. याने नक्की फरक पडेल.
डाळिंब्याचे साल
डाळिंब्याचे साल तोंडातील दुर्गंधी काढण्यासाठी मदतगार आहे. यासाठी डाळिंब्याचे सालीला गरम पाण्यात उकळवत ठेवा. त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे तोंडातील दुर्गंधी निघण्यास मदत होईल.
सोबत ठेवा पुदिना आणि तुळशीचे पान
तोंडातील दुर्गंधीमुळे जर चारचौघात बोलताना लाज वाटत असेल तर, नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचा वापर करा. यासाठी नेहमी सोबत पुदिना आणि तुळशीचे पानं ठेवा. ही पानं खाल्ल्याने तोंडातील दुर्गंधी निघून जाते. यासह फ्रेश वाटेल.
लिंबू पाणी प्या
जेवल्यानंतर लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्या. यामुळे जेवल्यानंतर उद्भवणारी दुर्गंधी तोंडातून निघून जाईल.
लवंग आणि बडीशेप
तोंडातील दुर्गंधी घालवण्यासाठी आपण लवंग आणि बडीशेपचा वापर देखील करू शकता. याने तोंडातील दुर्गंधी झटकन निघून जाईल.