Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवसाची सुरुवात ' हे ' ६ पदार्थ खाऊन चुकूनही करू नये; तब्येत बिघडेल, अपचन - गॅसेसचा होतो त्रास

दिवसाची सुरुवात ' हे ' ६ पदार्थ खाऊन चुकूनही करू नये; तब्येत बिघडेल, अपचन - गॅसेसचा होतो त्रास

Don't Consume These Foods On Empty Stomach! : ब्रेकफास्टमध्ये हे ६ प्रकारचे पदार्थ खात असाल तर; तब्येत बिघडू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 03:40 PM2024-07-17T15:40:31+5:302024-07-17T17:18:55+5:30

Don't Consume These Foods On Empty Stomach! : ब्रेकफास्टमध्ये हे ६ प्रकारचे पदार्थ खात असाल तर; तब्येत बिघडू शकते

Don't Consume These Foods On Empty Stomach! | दिवसाची सुरुवात ' हे ' ६ पदार्थ खाऊन चुकूनही करू नये; तब्येत बिघडेल, अपचन - गॅसेसचा होतो त्रास

दिवसाची सुरुवात ' हे ' ६ पदार्थ खाऊन चुकूनही करू नये; तब्येत बिघडेल, अपचन - गॅसेसचा होतो त्रास

आपण जे काही खातो आणि पितो त्याचा थेट परिणाम आपल्या हेल्थवर होतो (Health Tips). जेवण बरोबर नसेल तर, तब्येत बिघडायला वेळ लागत नाही. दिवसाची सुरुवात ही हेल्दी पदार्थ खाऊन करावी (Avoid food at morning). कारण आपण जवळपास १० ते १२ तासानंतर जेवतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात करताना, पोटात जाणारी पहिला पदार्थ हेल्दी असावा.

जर दिवसाची सुरुवात हेल्दी किंवा 'या' ५ पदार्थातून केली तर, पचनाच्या निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात. रिकाम्या पोटी कोणते पदार्थ टाळावे, याची माहिती पोषणतज्ज्ञ आर्या जागुष्टे यांनी दिली आहे. हे पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. शिवाय तेब्येतही बिघडू शकते(Don't Consume These Foods On Empty Stomach!).

लिंबूवर्गीय फळे

लिंबूवर्गीय फळे जसे की संत्री, लिंबू, द्राक्ष ही फळे रिकाम्या पोटी खाणं टाळावे. या फळांमध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पोटातील आम्लता वाढू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि पोटाचे विकार वाढू शकतात.

चहा

काही जण सकाळी बेड टी दिवसाची सुरुवात करतात. पण दिवसाची सुरुवात चहा पिऊन करणे टाळावे. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने छातीत जळजळ, ब्लड शुगर वाढणे, ॲसिडिटी शिवाय थकवा देखील जाणवू शकतो.

रोज खा ४ पैकी १ पदार्थ, चष्मा लागणार नाही-डोळ्यांचा नंबर वाढण्यापूर्वी व्हा जाग

मसालेदार पदार्थ

दिवसाची सुरुवात कधीही मसालेदार पदार्थांनी करू नये. यामुळे तब्येत बिघडू शकते. शिवाय आतडे आणि पोटाचे विकार वाढू शकतात.

कॉफी

कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते. जे सकाळी रिकाम्या पोटी पिणं योग्य नाही. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. शिवाय स्ट्रेस देखील वाढू शकतो.

तेलकट पदार्थ

सकाळची सुरुवात तेलकट पदार्थ खाऊन कधीही करू नये. या पदार्थांमध्ये फॅट्स जास्त असते. ज्यामुळे अपचन आणि वजन देखील वाढू शकते.

'या' वेळेत चहा पिणं म्हणजे आजारांना आमंत्रणच, होतील ४ त्रास - ही चूक पडू शकते महागात

बेकरी प्रॉडक्ट्स

बेकरी प्रॉडक्ट्समध्ये मैद्याचे प्रमाण जास्त असते. त्यात कार्बोहायड्रेट असतात. सकाळी कार्बोहायड्रेट खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे सकाळी बेकरी प्रॉडक्ट्स खाणं टाळावे.

Web Title: Don't Consume These Foods On Empty Stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.