Join us   

शिजवू नका, भाजून खा! भाज्या भाजून खाण्याचे ३ फायदे, अभ्यास सांगतात पोषणाचे सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2023 1:05 PM

Benefits of Roasted Vegetables अशा अनेक भाज्या आहेत ज्या भाजल्यावर त्याचे फायदे दुप्पट होतात. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलनुसार, भाज्या भाजून खाल्ल्याने त्यातील नैसर्गिक साखरेचाही फायदा होतो.

जेवण चविष्ट बनवण्यासाठी आपण तेल आणि मसाल्यांची फोडणी देऊन बनवतो. त्या भाजीला आपण खूप वेळ शिजवून तयार करतो. मात्र, भाज्या जास्त वेळ शिजवल्याने त्याची पौष्टिकता नष्ट होते. भाज्यांमधील पौष्टीक घटक तसेच ठेवण्यासाठी त्यांना जास्त न शिजवणे हाच एक पर्याय आहे. कारण त्यातील पोष्टिक घटक कमी झाल्याने शरीराला त्यातील उत्तम स्त्रोत मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण भाज्या भाजून खाऊ शकता. अशा अनेक भाज्या आहेत ज्या भाजल्यावर त्याचे फायदे दुप्पट होतात.

फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलनुसार, भाज्या भाजून खाल्ल्याने त्यातील नैसर्गिक घटक शरीराला मिळतात. अन्नाच्या पृष्ठभागावर कॅरामलायझेशन होते, याने भाज्यांची चव वाढते. दुसरीकडे, अन्न तेलात तळल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे भाज्या नेहमी भाजून खाणे उत्तम ठरेल.

व्हिटॅमिन बी अन्नामध्ये टिकून राहते

भाज्या आपण भाजून खात असाल तर, त्यातील पौष्टीक तत्वे शरीराला मिळतातच यासह, चयापचय, मेंदूचे आरोग्य आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण जेव्हा भाज्या अधिक शिजवून खातो तेव्हा, त्यातील असलेले व्हिटॅमिन बी पाण्यात विरघळते आणि नष्ट होते. त्याचा आपल्याला फायदा होत नाही. थायमिन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट कमी होतात, पण तेच भाजून घेतल्यास, बी व्हिटॅमिनची उपस्थिती कायम राहते.

व्हिटॅमिन सीचे प्रमाण तसेच राहते

जनरल ऑफ फूड अँड अॅग्रिकल्चरल केमिस्ट्रीच्या मते, व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. याशिवाय कोलेजन उत्पादन हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे, परंतु जर व्हिटॅमिन सीचा अन्न स्त्रोत जास्त काळ पाण्याने शिजवला गेला तर व्हिटॅमिन के नष्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे भाज्या भाजून खाण्याचा सल्ला दिला जातो.

अतिरिक्त चरबी वाढत नाही

भाज्या भाजून खाल्ल्याने शरीरात अतिरीक्त चरबी जमा होत नाही. त्यातील पौष्टीक घटक अबाधित राहतात. त्यामुळे भाजून खाणे हा उत्तम पर्याय आहे. यासह भाजी भाजून अन्न खाल्ल्याने त्यातील बॅक्टेरियापासून बचाव होतो. 

टॅग्स : भाज्याहेल्थ टिप्सआरोग्य