Join us   

विषारी दुधी भोपळा ठरू शकतो जीवघेणा, चवीला लागत असेल कडू तर, आत्ताच फेकून द्या कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2023 5:33 PM

Don't eat bitter pumpkin, study warns : कडू दुधी भोपळा खाल्ल्याने होऊ शकतो गंभीर आजार, वेळीच ओळखा..

जे निसर्गात उगतं ते सगळं आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते, असे वडीलधारी लोकं आपल्याला सांगत असतात. पाले भाज्या, कडधान्य, डाळी, वनस्पती या सगळ्या गोष्टींचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे. मात्र, प्रत्येक गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असेलच असे नाही. काही वेळेस चुकीच्या पद्धतीने किंवा पारखून अन्न न खाल्ल्यास आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आणि त्यातीलच एक प्रकार म्हणजेच दुधी भोपळा (Bottle Gourd).

आता तुम्ही म्हणाल दुधी भोपळा आरोग्यासाठी चांगला असतो, मग तो घातक कसा? दुधी भोपळ्यामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे आढळते. जे वजन घटवणे, मधूमेह, युरीन इंफेक्शन यावर परिणामकारक ठरते. पण चवीला कडू असणारा दुधी भोपळा आरोग्यासाठी जीवघेणा ठरू शकतो(Don't eat bitter pumpkin, study warns).

चुकूनही खाऊ नका कडू दुधी भोपळा

द हेल्थ साईट या वेबसाईटनुसार, 'अनेक दुधी भोपळ्यात कुकुरबिटिनिक्स नावाचे विषारी संयुग आढळतात. या कंपाऊंडमुळे दुधी भोपळ्याची चव ही कडू लागते. त्यामुळे आयुर्वेदानुसार कडू चवीचा दुधी भोपळा खाण्यास टाळावा.'

दिवसातून एकदा तरी जमीनीवर बसून मांडी घालून जेवण्याचे फायदे, तज्ज्ञ सांगतात-उपाय सोपा, तब्येतीत दिसेल मोठा फरक

विषारी दुधी भोपळा कसा ओळखायचा?

प्रत्येक दुधी भोपळा हा सारखाच दिसतो. फक्त आकार किंवा रंगामध्ये बदल असतो. अशा वेळी विषारी दुधी भोपळा ओळखणे कठीण जाते. त्यामुळे दुधी भोपळ्याचा ज्यूस किंवा भाजी करताना, आधी छोटा तुकडा चाखून पाहा. जर दुधी भोपळ्यामध्ये कडूपणा असेल तर, याचा अर्थ तो खाण्यायोग्य नाही. 

एक चमचा मधात मिसळा मेथीचे दाणे, पोटाची चरबी झरझर घटेल-रक्तातील साखरही राहील नियंत्रणात

विषारी दुधी भोपळा खाण्याचे नुकसान

कडू दुधी भोपळा खाल्ल्याने किंवा त्याचा ज्यूस प्यायल्याने पोटदुखी, उलट्या, मळमळ, जुलाब, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्राव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर काही गंभीर प्रकरणांमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. अशी लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य