Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नाश्ता करताना अजिबात करु नका ३ चुका, पचनही बिघडतं-नाश्त्यातलं पोषण गायब

नाश्ता करताना अजिबात करु नका ३ चुका, पचनही बिघडतं-नाश्त्यातलं पोषण गायब

Avoid 3 Mistakes while having Breakfast : अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याकडे आपण ब्रेकफास्ट करताना विशेष लक्ष द्यायला हवं याविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 01:12 PM2023-08-04T13:12:50+5:302023-08-04T15:03:29+5:30

Avoid 3 Mistakes while having Breakfast : अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याकडे आपण ब्रेकफास्ट करताना विशेष लक्ष द्यायला हवं याविषयी

Don't make 3 mistakes about breakfast; Otherwise, instead of getting nutrition from breakfast... | नाश्ता करताना अजिबात करु नका ३ चुका, पचनही बिघडतं-नाश्त्यातलं पोषण गायब

नाश्ता करताना अजिबात करु नका ३ चुका, पचनही बिघडतं-नाश्त्यातलं पोषण गायब

नाश्ता हा आपल्या दिवसभराच्या आहारातील सगळ्यात पहिला आहार असतो. हा आहार पोटभरीचा आणि पौष्टीक असावा असं आपण नेहमी ऐकतो. त्यानुसार नाश्त्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स देणारे पदार्थ खावेत असे आवर्जून सांगितले जाते. आपणही सकाळच्या वेळी घरातून बाहेर पडताना पोटभर खाऊनच बाहेर पडतो. लवकर बाहेर पडायचे असेल तर आपण नाश्त्याचा डबा घेतो किंवा वेळप्रसंगी बाहेर काहीतरी खातो. मात्र हा ब्रेकफास्ट करताना आपल्याकडून काही चुका होण्याची शक्यता असते. या चुकांचा आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. पण याच ब्रेकफास्टबाबत ३ चुका अजिबात करु नयेत असे डॉ. डिंपल जांगडा सांगतात. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याकडे आपण ब्रेकफास्ट करताना विशेष लक्ष द्यायला हवं याविषयी समजून घेऊया (Avoid 3 Mistakes while having Breakfast)...

१. खूप जास्त प्रमाणात खाणे

घरातून बाहेर पडणार आहोत किंवा सकाळच्या वेळी भूक लागते म्हणून काही जण खूप जास्त ब्रेकफास्ट करतात. अनेकांना तर ब्रेकफास्ट म्हणून जेवायचीच सवय असते. मात्र असे करणे योग्य नाही कारण आपल्या पोटात असलेले डायजेस्टीव्ह एन्झाइम्स म्हणजेच अग्नीचा थेट सूर्याशी संबंध असतो. सूर्य सकाळी उगवत असल्याने त्याची क्षमता तुलनेने कमी असते त्यामुळे सकाळच्या वेळी कमी प्रमाणात खायला हवे. दुपारच्या वेळी जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा अग्नी पेटलेला असतो. अशावेळी भरपूर प्रमाणात खायला हवे. तर सूर्यास्ताच्या आधी अगदी कमी, हलके असे काहीतरी खावे. यामुळे आपल्या पोटाची आणि पचनशक्तीची योग्य ती काळजी घेतली जाते. 

२. एकाच वेळी खूप वेगवेगळ्या गोष्टी खाणे

अनेकदा आपण शरीराचे पोषण व्हावे म्हणून सकाळच्या आहारात जास्तीत जास्त गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामुळे एकाच वेळी फळं, सुकामेवा, दूध, शिजवलेले अन्न, ओटस, दही असं सगळं एकत्र घेतो. पण असं करणं योग्य नाही. पण असे वेगवेगळ्या गुणधर्मांचे पदार्थ एकावेळी घेणे योग्य नाही. याचा आपल्या पचनसंस्थेवर ताण येण्याची शक्यता असते. फळं ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसोबत खाऊ नयेत. सकाळी आधी फळं किंवा सुकामेवा खावा आणि त्यानंतर काही वेळ गॅप घेऊन नाश्ता करावा. 

३. नाश्त्यानंतर आंघोळ करणे

अनेकांना सकाळी घाईने सगळं आवरायची सवय असते. मग आवरुन झालं की साहजिकच भूक लागते त्यामुळे नाश्ता केला जातो आणि मग घाईने ऑफीसला किंवा बाहेर जायचे असल्याने झटपट आंघोळीला जावे लागते. मात्र नाश्ता झाल्यावर अंगावरुन पाणी घेतल्यास त्याचा पचनक्रियेवर विपरीत परीणाम होतो आणि अग्नीवर ताण येतो. त्यामुळे नाश्ता करण्याच्या आधी आंघोळ करायला हवी.  
 

Web Title: Don't make 3 mistakes about breakfast; Otherwise, instead of getting nutrition from breakfast...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.