Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फळं खाताना 6 चुका अजिबात करू नका! फळं खाऊन पोषण हवं की आजार?

फळं खाताना 6 चुका अजिबात करू नका! फळं खाऊन पोषण हवं की आजार?

फळं आरोग्यासाठी चांगली असतात पण ती कशा पद्धतीने खायची याची पुरेशी माहिती असायला हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 04:39 PM2021-12-08T16:39:43+5:302021-12-08T17:03:06+5:30

फळं आरोग्यासाठी चांगली असतात पण ती कशा पद्धतीने खायची याची पुरेशी माहिती असायला हवी...

Don't make 6 mistakes while eating fruit! Need to eat fruits and get nutrition or disease? | फळं खाताना 6 चुका अजिबात करू नका! फळं खाऊन पोषण हवं की आजार?

फळं खाताना 6 चुका अजिबात करू नका! फळं खाऊन पोषण हवं की आजार?

Highlightsफळं खाताना काही किमान नियम लक्षात घ्यायला हवेत फळं खाताना या चुका पडतील महागात, आरोग्यावर विपरीत परिणाम

फळ खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं असं आपण नेहमी ऐकतो. फळांमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असणारे असे असंख्य घटक असतात. नैसर्गिकरित्या गोड असणारी ही फळं आपल्या शरीराचे अनेक अर्थांनी पोषण करतात. त्यामुळे दररोज एकतरी फळ खायलाच हवे. पण हे फळ कोणते असावे, ते कशा पद्धतीने खाल्लेले चांगले, कोणत्या वेळेला खाल्ले तर शरीराचे पोषण होते याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. कारण महिला स्वत:च्या आरोग्याबरोबरच कुटुंबियांच्या आहाराची काळजी घेणाऱ्या मुख्य स्रोत असतात. महिलांनीच आहाराच्या चुकीच्या पद्धती फॉलो केल्या तर घरातील इतर मंडळीही त्याच पद्धती फॉलो करतील आणि त्यामुळे एकूण कुटुंबाचेच आरोग्य बिघडू शकेल. पण योग्य वेळी पुरेशी माहिती घेतली तर तुम्ही स्वत:चे आणि कुटुंबियांचे चांगल्या पद्धतीने पोषण होईल याची काळजी घेऊ शकता. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. समीर जमदग्नी यांनी याबाबत ‘लोकमत सखी’शी संवाद साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण ज्याठिकाणी राहतो त्याठिकाणी पिकणारी स्थानिक फळं आपण आवर्जून खायला हवीत. म्हणजेच महाराष्ट्रात राहून आपण अॅव्होकॅडो किंवा सफरचंद जास्त प्रमाणात खात असू तर ते आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. फळे खाताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत डॉ जमदग्नी सांगतात

१. आपली प्रकृती ओळखा

आपली प्रकृती ओळखून आपण फळांची निवड केली पाहिेजे. वात, कफ आणि पित्त या तीन प्रकृती आयुर्वेदात सांगितल्या आहेत. आपली प्रकृती कोणती हे ओळखून त्यानुसार आपण फळांची निवड करायला हवी. तसेच आपल्याला आरोग्याच्या कोणत्या तक्रारी आहेत त्यानुसार फळांची निवड हवी. अन्यथा आपल्याला आधीपासून असलेले त्रास आपण चुकीच्या आहारपद्धतीमुळे वाढवून घेऊ शकतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. फळांची साले काढू नका 

चिकू, सफरचंद, पेरु यांसारख्या फळांच्या सालातून आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक पोषक घटक आपल्याला मिळतात. फळांबरोबरच त्यांच्या सालांमध्येही उपयुक्त अशी खनिजे, लोह व इतर घटक असतात. पण ही साले आपण काढून टाकली तर फळांतील हे घटक वाया जातात आणि आपल्याला त्या फळातून म्हणावे तितके पोषण मिळत नाही. त्यामुळे शक्य असतील ती फळे सालासकट खायला हवीत. 

३. कच्ची फळे खा, ज्यूस नको 

फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे फळे चावून खाणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते. पण तुम्ही जर फळांचा ज्यूस केला तर तो हा ज्यास थेट पोटात जातो आणि पोटात रासायनिक क्रिया होऊन पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे फळे बारीक कापून किंवा ज्यूस करुन खाण्यापेक्षा चावून खाणे चांगले.

४. जेवणाबरोबर फळे नको 

आपण जेवतो ते अन्न शिजवलेले असते. त्यामुळे त्यावर एकप्रकारची प्रक्रिया झालेली असते. परंतु फळे कच्च असतात. शिजवलेले अन्न आणि कच्ची फळे सोबत पचण्यास जड जाते. त्यामुळे पचनक्रियेवर ताण येतो. म्हणून जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर लगेच फळ खाणे चांगले नाही. फळ जेवणाच्या २ तास आधी किंवा दोन तास नंतर खावीत. 

(Image : Google)
(Image : Google)

५. सूर्यास्तानंतर फळे नकोत 

फळ पचण्यास शरीराला थोडा ताण पडतो. तसेच फळांमुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे फळे दिवसाच्या वेळात खावीत. यातही उठल्या-उठल्या फळ खाणे आरोग्यासाठी म्हणावे तितके फायदेशीर नसते. ११ वाजता किंवा ४ वाजता दोन जेवणांच्या मधल्या वेळी किंवा दुपारच्या वेळी फळे खायला हवीत. ही वेळ फळे खाण्यासाठी सगळ्यात चांगली. सायंकाळी ५ नंतर मात्र अजिबात फळे खाऊ नयेत. 

६. रेफ्रिजरेट केलेली फळे खाऊ नयेत 

फळं ही बाजारातून आणल्यानंतर फ्रेश असतानाच खायला हवीत. फ्रिजमध्ये साठवल्यामुळे फळांमधील पोषण कमी होते. त्यामुळे फळे ही साठवणूक करुन खाणे योग्य नाही. फळांचे तापमान कमी झाल्याने ती खाण्यासाठी पुरेशी पोषक राहत नाहीत. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवायचीच असल्यास फळे फ्रिजमधून बाहेर काढून तासाभराने खायला हवीत. तसेच फळांवर मोठ्या प्रमाणात किटकनाशके फवारलेली असल्याने फळे स्वच्छ धुवून मगच खायला हवीत. 
 

Web Title: Don't make 6 mistakes while eating fruit! Need to eat fruits and get nutrition or disease?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.