सर्वच प्रकारच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण महिलांच्या आरोग्याचा विचार करता चिया सीड्स जास्त फायदेशीर असतात. चिया सीड्स हे आपल्या आरोग्यासाठी सुपरफूड आहेत. आजकाल बरेचजण आपल्या रोजच्या डाएटमध्ये चिया सीड्सचा समावेश करतात. चिया सीड्समध्ये ओमेगा - ३ फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडेंट, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम फार मोठ्या प्रमाणात असतात. चांगल्या आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील चिया सीड्स खाल्ले जातात(foods to avoid mixing with chia seeds).
रोजच्या डाएटमध्ये चिया सीड्स खाताना आपण फळं, स्मूदी, दूध किंवा पाण्यांत भिजवून चिया सीड्स खातो. यासोबतच काही पदार्थ तयार करताना त्यात चिया सीड्सचा वापर केला जातो. परंतु असे अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये चिया सीड्स मिक्स करून खाल्ल्याने त्या चिया सीड्समधील पोषक घटक आपल्या आरोग्याला पुरेशा प्रमाणांत मिळू शकत नाहीत. यासाठीच चिया सीड्सचा आपल्या डाएट मध्ये समावेश करताना आधी ते कोणकोणत्या पदार्थांसोबत खाल्ले जात नाहीत हे देखील लक्षात घेणे गरजेचे असते. नेमके कोणत्या पदार्थांसोबत चिया सीड्स खाऊ नयेत ते पाहूयात(Don't mix chia seeds with these 5 foods).
१. हाय फायबर असलेले पदार्थ :- ज्या पदार्थांमध्ये हाय फायबर असतात अशा पदार्थांसोबत चिया सीड्स खाणे टाळावे. जर आपण हाय फायबर असलेल्या पदार्थांसोबत चिया सीड्स खाल्ले तर चिया सीड्समध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीराला शोषण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे चिया सीड्समध्ये असलेले झिंक, लोह आणि कॅल्शियम शरीरात योग्य पद्धतीने शोषले जात नाही. एवढेच नाही तर या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला ब्लोटिंग, ॲसिडिटी, गॅस किंवा पोटदुखी यांसारख्या समस्या होऊ शकतात.
२. गोड पदार्थ :- बरेचजण गोड पदार्थ बनवण्यासाठी चिया सीड्सचा वापर करतात. आईस्क्रीम, पुडिंग किंवा इतर डेझर्ट तयार करण्यासाठी चिया सीड्सचा वापर केला जातो. परंतु गोड पदार्थांसोबत चिया सीड्स खाल्ल्याने आपल्या हार्मोन्सच्या पातळीत सारखे बदल होत असतात. यामुळे रक्तातील साखरेचे असंतुलन होऊन मधुमेह, उच्च रक्तदाब आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोणत्याही गोड पदार्थांसोबत चिया सीड्स खाऊ नयेत.
३. डेअरी प्रॉडक्ट्स :- ज्यांना लॅकटोज इंटॉलरेंसची समस्या आहे अशांनी डेअरी प्रॉडक्ट्ससोबत चिया सीड्स चुकीनही खाऊ नयेत. जर तुम्ही दूध, दही किंवा ताक यासारख्या पदार्थांसोबत चिया सीड्स खाल्ले तर यामुळे आपल्या पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन आणि अॅसिडिटी यांसारख्या समस्या होऊ शकतात.
४. कॅफिन असलेले पदार्थ :- आजकाल काहीजण कोल्ड कॉफी किंवा आईस टी मध्ये देखील चिया सीड्स घालून पितात. परंतु असे केल्याने आरोग्यास हानी पोहोचू शकते. कॅफिनचे प्रमाणात जास्त असलेल्या पदार्थांसोबत चिया सीड्स खाल्ले तर असे अन्नपदार्थ पचण्यास वेळ लागू शकतो. यामुळे उलट्या, मळमळ किंवा पचनाच्या समस्या होऊ शकतात.
५. चवीला आंबट आणि पाणीदार फळं :- चिया सीड्स आंबट आणि जास्त प्रमाणात पाणी असणाऱ्या फळांसोबत खाणे शक्यतो टाळा. कारण अशा प्रकारे फळांसोबत चिया सीड्स खाल्ल्याने ते पचायला जास्त वेळ लागू शकतो. यामुळे अपचन, अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात.
६. आपण चिया सीड्स कोणत्या पदार्थांसोबत खाऊ शकता?
तुम्ही चिया सीड्स पाण्यात मिसळून पिऊ शकता. यासोबतच चवीला गोड नसलेली स्मूदी, सॅलॅड किंवा काही मोजक्याच फळांसोबत खाऊ शकता.