Join us   

साधाच तर थंडी-ताप असं म्हणून अंगावर काढू नका, सर्दी-खोकला-तापाकडे पावसाळ्यात दुर्लक्ष धोक्याचं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2022 7:48 PM

Health Tips For Monsoon: थंडी- तापच तर आहे... होईल बरा, असं म्हणत तब्येतीकडे दुर्लक्ष नकोच. लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांच्याबाबत तर असा निष्काळजीपणा मुळीच नको.

ठळक मुद्दे वातावरण थंड झालंय... सर्दी, खोकला, थंडी, ताप होणारच असं म्हणून या आजारांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण असं करणं खरोखरंच धोकादायक ठरू शकतं.

कोणताही ऋतू बदलला की सुरुवातीला थोडा त्रास होतोच. त्या मानाने पावसाळा आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला तर जरा जास्तच त्रास होतो. कारण सर्दी, खोकला, शिंका, ताप, थंडी यासोबतच अनेक व्हायरल आजार या दिवसांत वाढलेले असतात. रोगप्रतिकारक शक्ती (how to boost immunity in monsoon) कमी असेल, तर लगेच हे आजार गाठतात. आणि घरातही लगेच एकाचा संसर्ग (infectious diseases in monsoon) दुसऱ्याला होतो. वातावरण थंड झालंय... सर्दी, खोकला, थंडी, ताप होणारच असं म्हणून या आजारांकडे आपण दुर्लक्ष (home remedies for cough and cold in monsoon) करतो. पण असं करणं खरोखरंच धोकादायक ठरू शकतं.

 

विशेषत: लहान मुले आणि घरातील वयस्कर व्यक्ती यांना जर असे आजार झाले असतील किंवा वारंवार होत असतील, तर त्यांच्याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. कारण सर्दी, ताप हे आजार वाढत जाऊन त्यांचं रुपांतर कधी निमोनिया, फ्लू यासारख्या आजारांमध्ये होईल, हे सांगता येत नाही. शिवाय हे आजार थेट श्वसनसंस्थेवर ॲटॅक करतात. त्यामुळे या आजारांवर वेळीच उपचार करणे बरे. असे काही आजार झाल्यास काय काळजी घ्यावी, याची माहिती डॉ. हलिमा येझदानी यांनी एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना दिली आहे.

 

सर्दी- खोकल्यासारखे आजार झाल्यास... १. आजकाल सर्दी- खोकला झाल्यानंतर काेरोनाचीही भीती असतेच. त्यामुळे अशी लक्षणे जाणवली आणि ती दोन- तीन दिवसांत कमी झाली नाही, तर कोरोना टेस्ट अवश्य करून घ्या. टेस्ट निगेटीव्ह आल्यास झालेले व्हायरल इन्फेक्शन कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी असणारी फळं मोठ्या प्रमाणात खा. तसेच पाणीही भरपूर प्रमाणात प्या आणि दिवसांतून २ वेळा वाफ घ्या. हे उपाय केल्यामुळे आजाराचा संसर्ग श्वसन यंत्रणेपर्यंत जाणार नाही.

 

२. पावसाळ्यात सर्दी- खाेकला, ताप असे आजार टाळण्यासाठी थंड, आंबट पदार्थ खाणं टाळावं. विशेषत: रात्री तर थंड आणि आंबट पदार्थ कटाक्षाने टाळलेले बरे. तसेच खाद्यपदार्थांमधून व्हिटॅमिन्स कसे जास्तीतजास्त प्रमाणात मिळतील याची काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेतल्या तरी उत्तम.

 

तब्येतीची अशीही काळजी घ्या.. - पावसाळ्यात पाणी खूप कमी प्यायल्या जाते. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. म्हणून या दिवसांत पाणी तर भरपूर प्या, पण त्यासोबतच काकडी, पुदिना देखील भरपूर खा. यामुळे शरीरातील पाणी पातळी संतुलित राहील.  - उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा - पाणी शक्यतो फिल्टर असावे किंवा उकळून प्यावे. - गरम कपडे घालण्यास प्राधान्य द्या. - घराच्या आसपास कुठेही पाण्याचे डबके साचणार नाही, याची काळजी घ्या. - लवंग, आलं, दालचिनी, ज्येष्ठमध, मिरे हे मसाले तसेच गवती चहा, तुळस, हळद आहारातून अधिकाधिक प्रमाणात घ्या. यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनामानसून स्पेशल