Join us

'या' ५ भाज्यांची साली म्हणजे पोषणाचा खजिना, कचरा म्हणून फेकू नका-शरीराला मिळेल भरपूर ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2024 14:55 IST

Don't Throw Away The Peels! 5 Fruits And Vegetables Skin : भाज्यांच्या सालीमध्ये असतात अधिक पोषक तत्त्वे; फेकण्याची चूक करू नका..

भाज्या हे पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत आहे (Vegetables Skin). विविध प्रकारच्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण काही लोक भाज्यांचे साल काढून त्याची भाजी करतात. पण खरंच भाज्यांचे साल काढून त्याची भाजी करणं गरजेचं आहे का? भाज्यांचे साल काढून न खाण्याचा सल्ला दिला जातो (Health Tips). बऱ्याच भाज्यांच्या सालींमध्ये महत्त्वाचे पोषक घटक असतात.

याबद्दल व्होलिटेरियन लाईफस्टाईच्या क्रिएटर मलिना मलकानी सांगतात, 'भाज्यांच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. या साली जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे मुख्य स्रोत आहे. साली खरंतर खाण्यासाठी फारशा चविष्ट लागत नाहीत, परंतु तरीही त्यांच्यामुळे मेटाबॉलिझम वाढते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहते'(Don't Throw Away The Peels! 5 Fruits And Vegetables Skin).

बटाटा

बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयर्न आढळतात. याशिवाय बटाट्याच्या सालीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

पोट साफच होत नाही? कॉन्स्टिपेशनमुळे हैराण? दुधात मिसळा '१' खास गोष्ट; रोजचा त्रास होईल कमी

गाजर

गाजर खाऊन शरीराला फायदे मिळावे असे वाटत असेल तर, गाजर सोलून खाणं टाळा. यात बीटा-कॅरोटीन नावाचा गुणधर्म असतो, जो शरीरातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करते. याशिवाय त्यात फायटोन्यूट्रिएंट्स असतात. यासह दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्मही आढळतात. ज्यामुळे शरीराला फायदाच होतो.

वांगी

वांग्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन के, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. वांग्याच्या सालीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला विविध आजारांपासून सरंक्षण करते. वांग्याच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल आढळतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

दुधीभोपळा

दुधीभोपळ्याची साल काढून काही लोक खातात. पण साली देखील खावे. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्याचे सेवन पोटासाठी अधिक फायदेशीर ठरते.

शुगर कंट्रोल ते बॅड कोलेस्टेरॉलवर खास उपाय, रोज आहारात हवी कोथिंबीर! फायदे किती? घ्या यादी..

कारलं

कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारल्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात आणि पेशींचे नुकसान होण्यापासून सरंक्षण करतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यभाज्याफळे