Join us   

श्रीराम नेने सांगतात खा ६ पदार्थ; प्रोटीनचा खजिना- वाढतील मसल्स - मिळेल ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 1:33 PM

Dr. Shriram Nene Revealed 6 Best Souces Of Protien : कोण म्हणतं शाकाहारी पदार्थात प्रोटीन नसते?

शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रोटीन गरजेचं आहे (Protien). प्रोटीनयुक्त आहार खाण्याचे अनेक फायदे आहेत (Doctor ShreeRam Nene). प्रोटीन स्नायू आणि हार्मोन्सच्या वाढीस मदत करते. प्रोटीनयुक्त आहार खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते (Health tips). आजकालच्या व्यस्त आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना पौष्टीक आहाराचे सेवन करण्यास मिळत नाही (Weight loss tips). जर आपल्याला थकवा, अंगदुखी, तसेच सांधेदुखीचा त्रास होत असेल तर, प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करायला हवे. पण प्रोटीन नक्की कोणत्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळते, हे अनेकांना ठाऊक नाही.

शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते असे म्हणतात, पण असे देखील काही पदार्थ आहेत, ज्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. डॉक्टर नेने यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी कोणत्या पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, याची लिस्ट शेअर केली आहे(Dr. Shriram Nene Revealed 6 Best Souces Of Protien).

'या' पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते..

- पनीर

- क्विनोआ

ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी खा ५ पदार्थ; तुम्ही कधीच काहीच विसरणार नाही

- शेंगदाणे

- काळी उडीद डाळ

- हिरवे वाटाणे

- हिरवे अख्खे मूग

पनीर

दुग्धजन्य पदार्थामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यात पनीरचा देखील समावेश आहे. १०० ग्रॅम पनीरमध्ये २१. ४३ ग्रॅम प्रोटीन असते. त्यात व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियम देखील मुबलक प्रमाणात आढळते.

क्विनोआ

आपण आहारात क्विनोआचा देखील समावेश करू शकता. एक कप शिजलेल्या क्विनोआमध्ये ८ - ९ ग्रॅम प्रोटीन असते. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

शेंगदाणे

आपण आपल्या आहारात शेंगदाण्याचा समावेश करतोच. मुठभर शेंगदाण्यामध्ये ४२६ कॅलरीज, ५ ग्रॅम कार्बोहायड्रेट, १७ ग्रॅम प्रोटीन असते. ज्यामुळे आरोग्याला भरपूर फायदे मिळतात.

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? पाहा, कानात मळ झाला तर काय करायचे..

काळी उडीद डाळ

काळी उडदाच्या डाळीचे आपण अनेक पदार्थ तयार करतो. यात पोषक घटक जास्त प्रमाणात आढळते. यात १२ ग्रॅम प्रोटीन आढळते. आपण काळ्या उडदाच्या डाळीचे आहारात समावेश करू शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स