गुळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. साखरेऐवजी गुळ खाण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात. वडीलधारी लोकं देखील गुळ-चणा, गुळ-शेंगदाणे, गुळाचा चहा यासह गुळाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण आपल्याला गुळाचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे माहित आहे का?
मुख्यतः हिंवाळ्यात गुळ खावा. थंडीत गुळाच्या सेवनाने शरीरात उष्णता टिकून राहते. शिवाय इतरही फायदे मिळतात. नियमित गुळाचे पाणी प्यायल्याने वजन, पचन याशिवाय इतर फायदे आरोग्याला होतात. गुळाचे पाणी नेमकं कसे करावे? यामुळे आरोग्याला कोणते फायदे मिळतात?(Drink warm jaggery water on empty stomach for these amazing benefits).
गुळामधील पौष्टीक घटक
गुळामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्त्वं आढळतात. त्यात व्हिटॅमिन बी१, बी६, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आर्यन, कार्बोहायड्रेट, सोडियम इत्यादी घटक शरीराला कोणत्या ना कोणत्या रूपात लाभकारी ठरतात.
स्वयंपाकासाठी-फराळासाठी कोणते खाद्यतेल वापरता? ‘हे’ ५ वापरत असाल तर बॅड कोलेस्टेरॉल नक्की वाढेल..
गुळाचे पाणी कसे तयार करायचे?
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, गुळात उष्णता असते, त्यामुळे उन्हाळ्यात आपण गुळाचा खडा खाऊन, त्यानंतर पाणी पिऊ शकता. इतर ऋतूत गुळ पाण्यात मिक्स करून खाऊ शकता. यासाठी ग्लासभर पाण्यात एक खडा गुळाचा घालून झाकून ठेवा. तयार पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, एक ग्लास गरम पाण्यात गुळाचा खडा घालून मिक्स करा, व हे पाणी रिकाम्या पोटी प्या.
गुळाचे पाणी पिण्याचे फायदे
पोटाचे विकार होतात दूर
खराब लाईफस्टाईल आणि योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे पोटाचे विकार वाढतात. गॅस, अॅसिडिटी, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या पोटाच्या विकाराने प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. जर यातून सुटका हवी असेल तर, सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे पाणी प्या. यामुळे मेटाबॉलिजम बूस्ट होते. शिवाय पचनक्रिया सुधारते.
वजन कमी करण्यासाठी प्रभावी
जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, नियमित सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे पाणी प्या. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी१, बी६ आणि व्हिटॅमिन सी आढळते. रोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी हळूहळू बर्न होते. ज्यामुळे गुळाचे पाणी वेट लॉससाठी फायदेशीर ठरते.
'मैने प्यार किया'तली सुमन आजही दिसते तरुण, पाहा तिचं सिक्रेट ग्रीन लंच- हिरव्यागार जेवणाची रंगत
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
गुळाचे पाणी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स आढळतात, जे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करून इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून गुळाचे पाणी प्या.
ब्लड सेल्सची निर्मिती होते
गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. जर आपल्याला अॅनिमियाची समस्या असेल तर, गुळाचे पाणी प्या. नियमित गुळाचे पाणी प्यायल्याने शरीरातील लाल ब्लड सेल्सची निर्मिती होते. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे पाणी प्या.
निद्रानाशाच्या समस्येपासून आराम
काहींना रात्रीच्या वेळेस लवकर झोप येत नाही, किंवा शरीर थकूनही झोप लागत नाही. अशा वेळी आपण सकाळी रिकाम्यापोटी ग्लासभर गुळाचे पाणी पिऊ शकता. नियमित गुळाचे पाणी प्याल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स वाढतात. ज्यामुळे रात्री चांगली झोप लागते.