आपल्यापैकी बऱ्याचजणांना सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर सर्वात आहे बेड टी - कॉफी पिण्याची सवय असते. काही लोंकाच्या दिवसाची सुरुवात ही चहा पिऊनच होते. एवढेच नाही तर बेड टी पिण्यापूर्वी काहीजण ब्रशही करत नाही. अशा लोकांचा असा विश्वास आहे की बेड टी प्यायल्यानंतर दिवसाची सुरुवात चांगली होते तसेच दिवसभर आपण उत्साही राहतो. असे कितीही लोक सांगत असले तरीही सकाळी उठल्या उठल्या अगदी तोंड न धुताच आधी चहा पिणं ही कौतुकाची गोष्ट नसून ती वाईट सवय आहे असं तज्ज्ञ सांगतात. अती चहा पिणे हे जेवढं घातक तितकाच एक कप बेड टी घेणेही नुकसानकारक आहे. सकाळी रिकाम्या पोटी एक कप गरम चहा पिणे आरोग्याच्या अनेक समस्यांना कारणीभूत ठरु शकतो.
आपल्याकडे महत्त्वाचे पेय म्हणून चहाकडे बघितलं जातं. पण चुकीच्या वेळेस , चुकीच्या पध्दतीनं चहा घेतल्याने वाईट परिणाम होतात हे समजून घेणं आवश्यक आहे. डायटीशियन प्रियांका जयस्वाल यांच्या मते, सकाळी उठताच चहा प्यायल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटू शकते, परंतु यामुळे अनेक आजार देखील होऊ शकतात. प्रियांका जयस्वाल या बेड टी पिण्याचे आरोग्यास होणारे तोटे तर सांगतातच पण सकाळी चहा कसा घ्यायला हवा याबाबतही मार्गदर्शन करतात(Drinking Bed Tea in the Morning is Bad for Health: Here's Why).
सकाळी उठल्या उठल्या बेड टी पिण्याचे दुष्परिणाम :-
१. पचन बिघडतं :- पचन क्रिया उत्तम चालण्यास बेड टी ची सवय अडथळा आणते. या सवयीमुळे पचन नीट होत नाही. म्हणूनच बेड टी घेणार्यां बहुतेकांना गॅसेस, अँसिडिटी, बध्दकोष्ठता, अपचन आणि पोटात जळजळ अशा समस्या जाणवतात.
जिभेवर पांढरा थर आहे ? ५ सोपे उपाय, आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात...
२. अँसिडिटीचा त्रास वाढतो :- रिकाम्या पोटी चहा घेण्याच्या सवयीमुळे अँसिडिटी होते. जर नेहमीच पोटात गॅसेस होत असतील, अँसिडिटी होत असेल तर या त्रासाचं मूळ आपल्या बेड टी च्या सवयीत आहे हे ओळखावं. रिकाम्या पोटी चहा घेणं, चहा खूप उकळून, परत परत गरम करुन पिणं, जास्त वेळा चहा पिणं या तिन्ही गोष्टीमुळे शरीरातील पित्त वाढतं.
पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करायला जास्त वेळ लागतो असे का ? वजन लवकर घटत नाही कारण...
३. मूड बदलतात-चिडचिड होते :- सकाळी उठल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने अंगातला आळस निघून जातो, ऊर्जा मिळते असं म्हटलं जातं. पण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. शरीरास पाणी कमी पडल्यानं दिवसभर थकवा वाटतो. मूड सतात बदलत असतात. अगदी छोट्याशा गोष्टींवरुनही संताप किंवा चिडचिड व्हायला लागते.
वजन कमी करण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे खाता ? ५ गोष्टी विसरू नका, नाहीतर होईल उलटेच...
४. तोंडांचं आरोग्य बिघडतं :- बेड टी घेतल्याने तोंडांच आतील आरोग्य खराब होतं. चहातील साखरेमुळे तोंडआत जिवाणू तयार होतात. यामुळे अँसिड वाढतं. दातांवरचं इनॅमल हा संरक्षक घटक निघून जातो. त्यामुळे दाताची संवेदनशिलता वाढते. दातांना कळ लागण्याचं प्रमाण वाढतं.
मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...
चहा पिण्याची नेमकी योग्य वेळ कोणती ?
१. तज्ज्ञांच्या मते, चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे न्याहारीनंतर किंवा न्याहारीसोबत चहा पिणे, तुम्ही संध्याकाळी स्नॅक्ससोबत चहा पिऊ शकता, परंतु रिकाम्या पोटी चहाने दिवसाची सुरुवात कधीही करू नका. २. बेड टी घेणं ही आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक बाब आहे. पण म्हणून चहा पिणं बंद करावं असं नाही. पण बेड टी च्या ऐवजी आरोग्यदायी असे ग्रीन टी, लेमन टी घेऊ शकतात. असे असले तरीही म्हणून सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ग्रीन टी- लेमन टी घेणं हे देखील त्रासदायक ठरतं. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आधी चूळ भरुन दात घासावेत. नंतर एक कपभर कोमट पाणी प्यावं. आणि मग अर्ध्या तासानं दूध घातलेला किंवा ग्रीन टी / लेमन टी थोडं मध घालून घ्यावा.
३. चहा नीट उकळलेला हवा, पण खूपही उकळू नये. अति उकळलेला चहा रिकाम्या पोटी प्यायल्याने त्रास होतो. अति उकळून चहा पिणं, खूप वेळा चहा घेणं ही वाईट सवय आहे. यामुळेही पचनावर परिणाम होतो. ४. चहामधे तुळशीची पानं यासारख्या औषधी वनस्पतींचा वापर टाळावा. कारण तुळशीतील आरोग्यदायी गुण हे चहातील कॅफिनमुळे शरीरात शोषले जात नाही.