Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वाढतं वजन ते संधिवात, एक उपाय कामाचा- तांब्याच्या भांड्यातले पाणी पिण्याचे फायदे अनेक 

वाढतं वजन ते संधिवात, एक उपाय कामाचा- तांब्याच्या भांड्यातले पाणी पिण्याचे फायदे अनेक 

तांबं (copper) हा धातुचा असा प्रकार आहे ज्यात साठवलेलं पाणी (drinking copper vessel water) शरीरासंबंधीचे अनेक विकार दूर करण्यास फायदेशीर ठरतं. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हा अनेक समस्यांवरचा सोपा उपाय आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 05:26 PM2022-07-02T17:26:09+5:302022-07-02T17:34:20+5:30

तांबं (copper) हा धातुचा असा प्रकार आहे ज्यात साठवलेलं पाणी (drinking copper vessel water) शरीरासंबंधीचे अनेक विकार दूर करण्यास फायदेशीर ठरतं. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हा अनेक समस्यांवरचा सोपा उपाय आहे.

Drinking copper vessel water is easy remedy on many health problems. Benefits of drinking copper vessel water | वाढतं वजन ते संधिवात, एक उपाय कामाचा- तांब्याच्या भांड्यातले पाणी पिण्याचे फायदे अनेक 

वाढतं वजन ते संधिवात, एक उपाय कामाचा- तांब्याच्या भांड्यातले पाणी पिण्याचे फायदे अनेक 

Highlightsतांब्याच्या भांड्यातील पाणी प्याल्यानं हाडं मजबूत होतात. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अवश्य प्यायला हवं. 

तांब्याच्या भांड्यात ( copper vessel)  रात्रभर पाणी भरुन ते पाणी सकाळी पिणं हे कोणतं फॅड नसून ती आरोग्यदायी सवय आहे. घरातली जुनी जाणती माणसं आजही हा उपाय करतात आणि तरूण पिढीला तांब्याच्या भांड्यातील  (drinking copper vessel water) पाणी पिण्याचा सल्ला देतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हा निरोगी राहाण्याचा सोपा उपाय आहे. तांबं हा धातुचा असा प्रकार आहे ज्यात साठवलेलं पाणी शरीरासंबंधीचे अनेक विकार दूर करण्यास फायदेशीर ठरतं. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्याल्यानं शरीरातील वात, कफ आणि पित्त संतुलित राहातं. तसेच  या पाण्यानं पोटाशी आणि घशाशी निगडित अनेक समस्या दूर होतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी (benefits of drinking copper vessel water)  पिणं हा अनेक समस्यांवरचा सोपा उपाय आहे. 

Image: Google

 तांब्याच्या भांड्यातलं पाणी का प्यावं?

1. तांब्यामध्ये सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे संधिवात आणि सांध्याशी निगडित समस्यांवर आराम मिळतो. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, ज्यांना सांध्याशी निगडित समस्या आहे त्यांनी रोज तांब्याच्या भांड्यातल्ं पाणी प्यायला हवं असा सल्ला तज्ज्ञ देतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्याल्यानं हाडं मजबूत होतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

2. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्याल्यानं यकृत आणि किडनीतील विषारी घटक बाहेर पडतात. तांब्याच्या धातूत असलेल्या गुणधर्मामुळे पोटात जाणाऱ्या हानिकारक जिवाणुंना अटकाव होतो. कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका तांब्यामुळे टळतो. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्याल्यानं संसर्गाचा धोका टळतो.

Image: Google

3. तांब्याच्या धातूत ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी रोज प्याल्यास तांब्यातील ॲण्टिऑक्सिडण्ट्सचा फायदा त्वचेला होतो. त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. त्वचेवर सुरकुत्या पडत नाही. तसेच चेहेऱ्यावरील वांगाचे डाग, काळपटपणा दूर होतो. तांब्यामुळे त्वचेचं मुक्त मुलकांपासून ( फ्री रॅडिकल्स) पासून रक्षण होतं.  

4. वजन कमी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांनी तर रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरावं आणि ते उठल्यानंतर प्यावं. तांब्याच्या भांड्यातील गुणधर्म शरीरातील फॅटस कमी करतात. 

5. मेंदूचं कार्य उत्तम चालण्यासाठी, मेंदू सक्रीय राहाण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाण्याची मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित प्याल्यास स्मरणशक्ती वाढते. मेंदूचं आरोग्य चांगलं राहातं.

Web Title: Drinking copper vessel water is easy remedy on many health problems. Benefits of drinking copper vessel water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.