Join us   

रात्री काही केल्या झोप येत नाही? एक ग्लास दुधात मिसळा खास पदार्थ, झोप लागेल गाढ, लगेच व्हाल ढाराढूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2024 6:02 PM

Drinking gulkand milk benefits for better sleep : Benefits of Having Gulkand with Milk at Night रात्री झोपण्याआधी दुधात एक चमचा गुलकंद मिसळून प्यायल्याने लागेल शांत, गाढ झोप...

'झोप' ही आपल्यासाठी खूप महत्वाची असते. हेल्दी राहण्यासाठी चांगली झोप घेणं फार महत्वाचे असते. आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आहार, व्यायाम, मानसिक स्वास्थ जेवढं गरजेच असत तसेच रात्रीची किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे देखील तितकेच गरजेचे असते. रात्री नीट शांत आणि सलग झोप लागलेली असेल तरच आपला पुढचा दिवस चांगला जातो. नाहीतर दिवसभर आपल्याला आळस आणि थकवा येत राहतो. आजकालच्या ताणतणावपूर्ण लाइफस्टाइलमुळे काहीजणांना झोप न येण्याची समस्या सतावते. रात्रीच्या वेळी व्यवस्थित झोप न लागल्याने आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो. रात्रीची झोप नीट झालीच नाही तर अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी अशा अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात(Benefits of Having Gulkand with Milk at Night).

आपल्यापैकी काहीजणांना रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सवय असते. झोपण्याआधी दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी अधिक जास्त फायदेशीर ठरते. दुधात ट्राइप्टोफॅन नावाचे अमिनो अ‍ॅसिड असते. ज्यामुळे आपल्याला चांगली झोप लागण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी दूध घेताना दुधात अनेक पदार्थ मिसळून प्यायल्याने झोप चांगली येते. रात्रीची चांगली झोप येण्यासाठी दूध पिण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. रात्री झोपण्याआधी दुधात गुलकंद मिसळून प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होईल. यासाठी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा गुलकंद मिसळून प्यायल्याने झोप येण्यासोबतच त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट पलक नागपाल यांनी चांगल्या झोपेसाठी दुधात गुलकंद मिसळून पिण्याचे फायदे काय आहेत हे सांगणारा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केला आहे(Drinking gulkand milk benefits for better sleep).

दुधात गुलकंद मिसळून पिण्याचे फायदे... 

१. गुलकंद हे गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर किंवा मधापासून बनवलेले एक नैसर्गिक औषध आहे. गुलकंद दुधात मिसळून प्यायल्याने चांगली झोप लागते. 

२. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट पलक नागपाल यांच्या मते, गुलकंद दुधात मिसळून पिणे हा आयुर्वेदिक उपाय गुलकंदातील औषधी आणि थंड गुणधर्मांसाठीच आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरतो. 

३. गुलकंद हे आपल्या शरीरात एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. 

पावसाळ्यात खायलाच हवी आजी करायची तशी आलेपाक वडी, सर्दी खोकला राहतो लांब - पाहा रेसिपी...

W सीटिंग पोझिशनमुळे मुलांना होतात आजार, करा ५ व्यायाम - ' हे ' गंभीर त्रास टाळा...

४. जर आपल्याला तोंड आले असेल किंवा दात खराब झालेले असतील याचबरोबर हिरड्यांच्या अनेक समस्या बऱ्या करण्यासाठीही गुलकंद खाणे उपयुक्त ठरते. 

५. मासिक पाळी दरम्यानच्या  समस्या आणि वेदना कमी करण्यास गुलकंद मदत करते. 

६. गुलकंद एक उत्कृष्ट पाचक टॉनिक म्हणून काम करते, जे भूक आणि पचन सुधारते आणि रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकते. इतकेच नाही तर हे गुलकंद दूध प्यायल्याने तुमचे हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते. टेन्शन कमी करण्यातही हे मदत करते. 

गुलकंद दूध कसे तयार करावे ? 

रात्री चांगली झोप येण्यासाठी तुम्ही गुलकंद दुध पिऊ शकता, त्यासाठी तुम्ही एक ग्लास दूध गरम करून त्यात एक किंवा दोन चमचे गुलकंद घाला आणि मिक्स करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी गुलकंद दुध नक्की प्या. हे दूध रोज झोपण्यापूर्वी प्यायल्याने तुमच्या शरीराला झोपेचा संकेत मिळतो, ज्यामुळे तुमचा मेंदू झोपेसाठी तयार होतो. हे गुलकंद दूध नियमित प्यायल्याने निद्रानाशाची समस्याही कमी होऊ शकते. जर तुम्हीही निद्रानाशाच्या समस्येने हैराण असाल तर या गुलकंद दुधाचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करू शकता.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सदूध