Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री झोपताना दूध प्यावं का? कुणी आणि किती प्यावं? तज्ज्ञ सांगतात, दूध का दूध..

रात्री झोपताना दूध प्यावं का? कुणी आणि किती प्यावं? तज्ज्ञ सांगतात, दूध का दूध..

Drinking Milk Before Bed: Is It a Good Idea? रात्री दूध पिऊच नये की रात्री झोपण्यापूर्वी तासभर आधी दूध प्यावं, नेमकं खरं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 03:04 PM2023-05-31T15:04:28+5:302023-05-31T15:05:24+5:30

Drinking Milk Before Bed: Is It a Good Idea? रात्री दूध पिऊच नये की रात्री झोपण्यापूर्वी तासभर आधी दूध प्यावं, नेमकं खरं काय?

Drinking Milk Before Bed: Is It a Good Idea? | रात्री झोपताना दूध प्यावं का? कुणी आणि किती प्यावं? तज्ज्ञ सांगतात, दूध का दूध..

रात्री झोपताना दूध प्यावं का? कुणी आणि किती प्यावं? तज्ज्ञ सांगतात, दूध का दूध..

दूध हे पूर्ण अन्न आहे. लहानपणापासून आपल्याला दूध पिण्याची सवय लावण्यात येते. दुधात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, प्रथिने मुबलक प्रमाणात आढळते. दुधात ८७ टक्के पाणी व उर्वरित १३ टक्के प्रथिने, चरबी, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे असते.

अमेरिकन डायट्री गाइडलाइनच्या मते, दररोज सुमारे २५० ग्रॅम दूध प्यावे. यामुळे शरीरात कॅल्शिअमची कमतरता भासणार नाही, व हाडे ठिसूळ होण्याचा धोका देखील कमी होतो. दुधाच्या सेवनाने हृदयाच्या संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो. यासोबतच हे वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते(Drinking Milk Before Bed: Is It a Good Idea?).

प्रत्येक व्यक्ती कोणत्याही वेळेला दूध पितात. दूध पिण्याची योग्य वेळ कोणती असावी हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. या विषयावर अपोलो हॉस्पिटलचे मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, डॉ. प्रियंका रोहतगी यांनी दूध पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत माहिती दिली आहे.

रात्री दूध पिण्याचे फायदे

चांगली झोप लागते

गरम दुधात लॅक्टाब्युमिन प्रोटीन आढळते. हे ट्रिप्टोफॅन अमीनो अॅसिड आहे. जे क्रिप्टोफॅन सेरोटोनिन हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात मदत करते. सेरोटोनिन मेलाटोनिन हार्मोन तयार करते. मेलाटोनिन हा झोपेचा हार्मोन आहे. जेव्हा मेलाटोनिन हार्मोन रिलीज होतो, तेव्हा रात्रीची झोप चांगली लागते. म्हणूनचं अधिक लोकं रात्रीच्या वेळी दूध पितात.

रोज सकाळी उपाशीपोटी लसूण खाल्ला तर कोलेस्टेरॉल खरंच कमी होते? तज्ज्ञ सांगतात..

रक्तातील साखर करते कमी

डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात की, ''जर आपल्याला दिवसभर चांगल्या पोषक तत्वांचे सेवन करायला वेळ मिळाला नसेल, तर रात्री एक ग्लासभर दूध प्या. रात्री दूध प्यायल्याने पोषक तत्वांची कमतरता भरून निघू शकते. दूध हे संपूर्ण अन्न आहे. ज्यामध्ये निरोगी प्रथिने आणि अमीनो ऍसिड देखील आढळते. त्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.

वजन कमी करण्यात मदत

रात्री दूध प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. दुधात फॅट नसून प्रथिने जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे भूक कमी लागते. दुधात जास्त कॅल्शियम असल्यामुळे चयापचय क्रिया योग्यरीत्या कार्य करते.

अपचन-गॅसेस यामुळेही डोके प्रचंड दुखते? ५ उपाय, पोट होईल साफ-डोकेदुखीही थांबेल..

हाडे मजबूत होते

दुधात जास्तीत जास्त कॅल्शियम असते. कॅल्शियम व्यतिरिक्त, त्यात फॉस्फरस, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असते. जे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. दररोज दुधाचे सेवन केल्याने ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.

तणाव कमी होतो

रात्री दूध प्यायल्याने सकाळी तणावमुक्त राहण्यास मदत होते. दुधात असलेले अमिनो अॅसिड कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी करते.

Web Title: Drinking Milk Before Bed: Is It a Good Idea?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.