अनेकांच्या सकाळची सुरूवात चहाने होते. प्रत्येक घरात सकाळी चहाचे प्यायला जातो. सकाळी चहा प्यायल्यानं झोप उडते आणि दिवसभर फ्रेश वाटतं. घशात खवखव, आळस, डोके दुखी यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. पण जर तुम्ही चुकीच्या वेळेला चहा प्यायलात तर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. चहा प्यायल्यानं कोणत्या समस्या उद्भवतात ते समजून घेऊ. (Drinking Tea After 7 Is Bad For Health)
झोप न येणं
संध्याकाळी चहा पिण्याचं सगळ्यात मोठं नुकसान असं की झोप येत नाही. चहात कॅफेन असते. जे एका उत्तेजकाप्रमाणे काम करते. झोपण्याच्या आधी चहा प्यायल्यानं तुमची स्लिप सायकल प्रभावीत होते आणि झोपण्यास त्रास होतो.
विंचरताना केसांचे पुंजके निघतात-खूप पातळ झाले? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय, दाट होतील केस
हार्ट बिट वाढणं
चहातील कॅफेन हार्ट बीट वाढवते आणि जर तुम्ही रात्री चहा पीत असाल तर घाबरल्यासारखं वाटतं. अशा स्थितीत उशीरा चहा घेणं चिंतेचा विषय ठरू शकते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवते.
डिहायड्रेशन
चहा एक नॅच्युरल मुत्रवर्धक आहे. ज्यामुळे शरीरातलं पाणी बाहेर फेकण्यास मदत होते. याशिवाय संध्याकाळच्यावेळी चहा प्यायल्यानं तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता जर तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल तर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जसं की थकवा, डोकेदुखी होते.
लेक १२ वर्षांची झाल्यानंतर आधी ५ गोष्टी शिकवा; आत्मविश्वास वाढेल-हूशार, खंबीर होईल मुलगी
पोटाच्या समस्या
संध्याकाळच्यावेळी चहा प्यायल्यानं पोटातील जळजळ, एसिडीटीच्या समस्या वाढतात. चहा पोटातील एसिडचे उत्पादनं वाढवते. ज्यामुळे पोटात गडबड होते आणि झोप पूर्ण होण्यास अडथळे येतात. म्हणून चहा वेळेतच प्यायला हवा.