Join us   

झोपण्यापूर्वी पाणी प्यावे का? किती प्यावे? तज्ज्ञ सांगतात, रात्री भरपूर पाणी पिऊन झोपत असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 4:13 PM

Drinking Water Before Bed: Is It Healthy : रात्रीच्या वेळी नेमके किती पाणी प्यावे?

शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी रोज पाणी पिणे आवश्यक आहे. सकाळी कोमट पाण्याने दिवसाची सुरवात करावी, असा सल्ला दिला जातो. आपल्या शरीराला पाण्याची आवशक्यता असते. पण पुरेसे पाणी शरीराला नाही मिळाले की, शरीर गंभीर आजारांनी ग्रासते. सकाळी उठण्यापासून ते मध्यरात्री झोपेच्यामध्येच अनेकांना तहान लागते. पाणी कधी आणि कितीप्रमाणात प्यायला हवे, याचे गणित आपल्याला माहित असायला हवे (Drinking Water).

पण अशा वेळी असा प्रश्न निर्माण होतो की, रात्री पाणी प्यावे का? बहुतांश आरोग्य तज्ज्ञ रात्री झोपण्यापूर्वी पाणी न पिण्याचा सल्ला देतात (Health Tips). पण झोपण्यापूर्वी पाणी कमी प्रमाणात का प्यावे? याबद्द्लची माहिती पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितली आहे(Drinking Water Before Bed: Is It Healthy?).

झोपण्यापूर्वी अधिक वेळ पाणी पिण्याचे नुकसान

झोपेचं खोबरं

जर आपण रात्रीचं जास्त प्रमाणात पाणी पिऊन झोपत असाल तर, लघवीसाठी वारंवार शौचालयात जावे लागेल. ज्यामुळे झोपेचं खोबरं होईल एवढं मात्र नक्की. उत्तम आरोग्यासाठी शांत झोप महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न पाणी करते. अपुऱ्या झोपेमुळे थकवा, अपचन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागेल.

बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

पोटात बिघाड

रात्रीच्यावेळेस तहान लागल्यास फार कमी प्रमाणात पाणी प्यावं. सतत जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने झोप मोड होते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. अपचन, पोट फुगणे, पोटात गडबड यासह इतर गंभीर समस्या निर्माण होतात. शिवाय तब्येत बिघडू शकते.

उच्च रक्तदाबेचा धोका

झोप कमी झाल्यामुळे रक्तदाब वाढू शकते. जे लोक नियमितपणे कमी झोप घेतात त्यांना उच्च रक्तदाबेचा धोका जास्त असतो. त्यामुळे उच्च रक्तदाबेचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी झोपेच्या १ ते २ तास आधी पाणी प्यावे. पण झोपण्यापूर्वी पाणी पिणे टाळावे.

कोण म्हणतं घरातली कामे केल्याने वजन कमी होत नाही? न चुकता ३ कामं करा, काही दिवसात घटेल वजन

किडनीवर पडतो दबाव

एका मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिणे किडनीसाठी घातक ठरू शकते. रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर पाणी फिल्टर करण्याचा दबाव पडतो. जे किडनीच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. शिवाय किडनीच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य