Join us   

सकाळी उठल्या उठल्या आधी पाणी प्यावे की काहीतरी खावे? तब्येतीला काय बरे, तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 2:13 PM

Drinking Water in the Morning: Does It Have Benefits? अनेक जण दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करतात, पाणी प्यावं की काही खावं, या प्रश्नाचे उत्तर..

जीवन जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. शरीरातील कार्य पार पाडण्यासाठी पाणी गरजेचं आहे. पाणी पिण्याचा देखील काळ - वेळ हा ठरलेला असतो. सहसा लोकं सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर फिरायला जातात, दात घासल्यानंतर काहीतरी खातात. तर काही लोकं पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. पण सकाळी पाणी प्यावं की काहीतरी खावून दिवसाची सुरुवात करावी हा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवते(Drinking Water in the Morning: Does It Have Benefits?).

यासंदर्भात, न्युज १८ या वेबसाईटशी बोलताना फरीदाबाद येथील मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. किरण दलाल सांगतात, ''सकाळी उठल्यानंतर शरीराला पाण्याची गरज भासते. जर आपण अंथरुणातून उठल्याबरोबर पाणी पीत असाल तर, आरोग्यावर डिहायड्रेशनची समस्या निर्माण होणार नाही. यासह शरीरातील सर्व रासायनिक प्रक्रिया पूर्ण होते, त्यामुळे सकाळी पाणी पिणे खूप फायदेशीर आहे.''

पाणी पोट साफ ठेवते

डॉ किरण दलाल सांगतात, ''सकाळी पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीराला फायदा होतो. यासह आतड्यातील घाण स्वच्छ होते. कारण पाणी हे क्लिंजरप्रमाणे काम करते. जे संपूर्ण आतडे म्हणजेच मोठे आतडे आणि कोलन देखील स्वच्छ करते. एक प्रकारे सकाळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. जर एखाद्याला बद्धकोष्ठतेची समस्या असेल, तर त्यांनी सकाळी पाणी प्यावं. पाणी शरीरातील घाण काढते.''

वाढलेली शुगरच नाही तर स्ट्रेसदेखील ठरतो सर्वात मोठा शत्रू, डायबिटिस असेल तर सावधान..

शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत

सकाळी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते शरीरातील द्रव संतुलन राखते व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. पाणी शरीर स्वच्छ करण्याचे काम करते. सकाळी पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया मजबूत होते. यासह शरीराचे तापमान नियंत्रित करते.

पाणी सामान्य प्यावं की गरम?

डॉ.किरण दलाल म्हणतात, ''सकाळी उठून कोमट पाणी प्यावे, कारण आपल्या शरीरातील तापमान, नेहमी बाहेरील तापमानापेक्षा थोडे जास्त असते, त्यामुळे कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

कांदा खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात येते का? संशोधन सांगते..

सकाळी पाणी प्यायल्याने वजन कमी होते का?

डॉ.किरण दलाल म्हणतात, ''पिण्याच्या पाण्याचा वजनाशी काहीही संबंध नाही. वजन कमी करताना सकाळी पाणी प्यायल्याने फारसा फायदा होत नाही, पण जर शरीराला डिहायड्रेट होऊ न दिल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जेवण केल्यानंतर ४५ मिनिटांनी पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारते.

ब्रश केल्यानंतर पाणी प्यावे की ब्रश न करता प्यावे?

ब्रश केल्यानंतर कोमट पाणी प्यावे की ब्रश करण्यापूर्वी? या प्रश्नावर डॉ.किरण सांगतात, ''आपण पाणी ब्रश करण्यापूर्वी किंवा ब्रश केल्यानंतर पिऊ शकता. दोन्ही स्थितीत पाणी पिणे फायदेशीर आहे.

जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यावरच पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात, पाणी किती-कधी प्यावं

किती पाणी प्यावे

प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रमाणात पाणी पिण्याची गरज असते. एका व्यक्तीने दररोज किमान ४० ते ५० मिली पाणी प्यावे.

टॅग्स : हेल्थ टिप्सपाणीआरोग्य