Join us   

थंडीत भल्या सकाळी तांब्याच्या भांड्यातले पाणी पिण्याचे १० जबरदस्त फायदे, दिवसभर वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 4:06 PM

Drinking Water Stored in Copper is Healthy in Winter : थंडीच्या दिवसांत तांब्याच्या भांड्यात रात्रभर साठवलेले पाणी प्यायल्यास त्याचा आरोग्याला अतिशय चांगले फायदे होतात.

ठळक मुद्दे हे पाणी अँटीमायक्रोबियल म्हणून काम करत असल्याने विविध प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून आपले संरक्षण करण्यासाठी उपयुक्त असतेलोहाचे शोषण व्हावे यासाठी तांबे उपयुक्त ठरते. त्यामुळे ज्यांना अॅनिमिया आहे अशांनी आवर्जून तांब्यातले पाणी प्यायला हवे. 

थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे आपण आहारात साधारणपणे उष्ण पदार्थांचा समावेश करतो. सकाळी उठल्यावर आपण दिवसाची सुरुवात साधारणपणे चहा किंवा कॉफीने करतो. त्याआधी फारतर आपण अर्धा ग्लास साधे पाणी किंवा कोमट पाणी पितो. पण हे पाणी कधी स्टीलच्या भांड्यात साठवलेले असते किंवा थेट अक्वागार्डचे असते. मात्र थंडीच्या दिवसांत तांब्याच्या भांड्यात रात्रभर साठवलेले पाणी प्यायल्यास त्याचा आरोग्याला अतिशय चांगले फायदे होतात. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार आपल्यासोबत याविषयी खास माहिती शेअर करतात (Drinking Water Stored in Copper is Healthy in Winter). 

(Image : Google)

सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातले पाणी प्यायले तर आपल्याला एनर्जेटीक वाटते. इतकेच नाही तर हलके आणि फ्रेश वाटण्यासही मदत होते असे दिक्षा यांचे म्हणणे आहे. तांब्याच्या भांड्यातले पाणी अतिशय वेगळे आणि नेहमीपेक्षा जास्त गोड लागते असेही त्या आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात. हे पाणी उष्ण असते, त्यामुळे थंडीत ते आरोग्यासाठी चांगले. पाहूयात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्याला होणारे फायदे...

१. वजन कमी होण्यासाठी हे पाणी फायदेशीर ठरते. 

२. पचनशक्ती सुधारण्यास याचा उपयोग होतो. 

३. वाढलेले वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून हे पाणी चांगले असते. 

४. हृदयासाठी हे पाणी उपयुक्त असते - हायपरटेन्शन आणि कोलेस्टेरॉल असणाऱ्यांना या पाण्याचा फायदा होतो.

५. ज्यांना आर्थरायटीसचा त्रास आहे किंवा ज्यांचे सांधे सुजतात अशांसाठी हे पाणी चांगले असते. 

६. शरीरात लोहाचे शोषण व्हावे यासाठी तांबे उपयुक्त ठरते. त्यामुळे ज्यांना अॅनिमिया आहे अशांनी आवर्जून तांब्यातले पाणी प्यायला हवे. 

७. आपल्याला एखादी जखम झाली असेल आणि आपण तांब्यातले पाणी पीत असू तर ती लवकर भरुन येते. 

८. थायरॉईड ग्रंथींशी निगडीत काही त्रास असेल तर त्याचे फंक्शनिंग नियमित होण्यास हे पाणी पिण्याचा फायदा होतो. 

९. त्वचा चांगली राहण्यास आणि मेलानिनची निर्मिती होण्यासाठीही तांब्यातील पाणी उपयुक्त असते. 

१०. हे पाणी अँटीमायक्रोबियल म्हणून काम करत असल्याने विविध प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून आपले संरक्षण करण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलथंडीत त्वचेची काळजी