Join us   

डायबिटीस असेल तर नक्की प्या ४ गोष्टी, शुगर राहील नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 1:04 PM

Drinks for Diabetics: What You Can Have and What to Avoid सोडा, कॉफी, चहा नको प्या ४ गोष्टी

सध्या भारतीय लोकांमध्ये झपाट्याने वाढणारा रोग म्हणजे मधुमेह. मधुमेहग्रस्त रुग्ण ब्लड शुगर मेन्टेन ठेवण्यासाठी आपल्या आहाराची विशेष काळजी घेतात. मधुमेहग्रस्त रुग्णांनी काय खावे काय टाळावे, याची माहिती त्यांना तज्ज्ञ देतात. मधुमेहग्रस्त रुग्णांना सोडा, फळांचे रस, चहा किंवा कॉफी इत्यादी दैनंदिन पेय टाळण्याचा सल्ला मिळतो. कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. पण त्या व्यतिरिक्त आपण ४ देसी ड्रिंक्स पिऊ शकता.

यासंदर्भात, फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांनी, ४ देसी ड्रिंक्सबद्दल माहिती दिली आहे. या पेयांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, व इतरही आजारांपासून सुटका मिळते(Drinks for Diabetics: What You Can Have and What to Avoid).

शुगर कंट्रोल करण्यासाठी प्या हे ४ पेय

नारळ पाणी

मधुमेहग्रस्त रुग्णांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला मिळतो. पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स, बी जीवनसत्त्वे, अमीनो ऍसिड इत्यादींसह पोषक आणि खनिजे समृद्ध, नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याव्यतिरिक्त ते पचन, त्वचेचे आरोग्य आणि प्रतिकारशक्तीही सुधारते.

सतत हिरडीतून रक्त येते? हा आजार की गंभीर आजाराची लक्षणे? डॉक्टर सांगतात..

ताक

ताक हे सर्वोत्तम दुग्धजन्य पदार्थ आहे. कारण यात साखरेचा समावेश नसतो. ताकाची टेस्ट वाढवण्यासाठी आपण त्यात  जिरे, आले, धणे इत्यादी पदार्थ मिक्स करू शकता. असे केल्याने या पेयाचे पौष्टिक मूल्य आणखी वाढते. यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. व अतिरिक्त चरबी देखील कमी होते.

कारल्याचे ज्यूस

मधुमेहग्रस्त रुग्णांना फळांचे रस न पिण्याचा सल्ला दिला जातो. पण आपण त्यांना पौष्टीक भाज्यांचे रस प्यायला देऊ शकता. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी कारल्याचा रस उत्तम मानला जातो. या भाजीमध्ये अशी संयुगे असतात, जी रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यात फॅट, कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही कमी असते.

पावसाळ्यात हमखास पोट बिघडतं, ४ गोष्टींची काळजी घ्या नाहीतर पावसाळ्यात तब्येत बिघडणारच!

आवळा रस

मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी आवळा खूप फायदेशीर ठरतो. याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. आवळा व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम हे खनिजे आढळतात. जे कार्बोहायड्रेट चयापचय नियंत्रित करते. यासह ब्लड शुगरची पातळी नियंत्रित करते. याव्यतिरिक्त आपण मेथीचे पाणी, दालचिनीचे पाणी, ग्रीन टी आणि हळदीचे पाणी पिऊ शकता. या सर्व गोष्टी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्सआरोग्य