Join us   

कोरड्या खोकल्याचा त्रास कायमचा घालवतील हे ५ उपाय; कफ सिरप घ्यायची गरजच लागणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 12:20 PM

Dry Cough Relief Home Remedies : सतत कोरडा खोकला तुमच्या दैनंदिन जीवनावर गंभीरपणे परिणाम करू शकतो. रात्री खोकला झाल्यास झोप मोडही होते. 

फक्त पावसाळ्यातच नाही तर वातावरणातील बदलांमुळे, धुळीच्या एलर्जीमुळे अनेकांना सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते. ऍलर्जीपासून ऍसिड रिफ्लक्सपर्यंत अनेक गोष्टींमुळे कोरडा खोकला होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये कोरड्या खोकल्यासाठी कोणतेही विशिष्ट कारण नसते. सतत कोरडा खोकला तुमच्या दैनंदिन जीवनावर गंभीरपणे परिणाम करू शकतो. रात्री खोकला झाल्यास झोप मोडही होते. (Studies claims these 5 home remedy can cure dry cough)

सुका खोकला किती दिवस टिकतो?

जर व्हायरल इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला झाला असेल तर तो 8 आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. कारण तो प्रौढांमध्ये 8 आठवडे आणि लहान मुलांमध्ये 4 आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. यापेक्षा जास्त वेळ खोकला राहणे हे जीवघेण्या आजारामध्ये कर्करोगाचे लक्षण असू शकते. सामान्यतः, रात्रीच्या वेळी कोरडा खोकला अधिक त्रासदायक असतो, ज्याला काहीवेळा कोरड्या खोकल्याचे सिरप देखील नियंत्रणात ठेवू शकत नाहीत. अशा स्थितीत घरगुती उपायांनी तुम्ही यापासून आराम मिळवू शकता.

रक्त वाढेल, हाडंही कायम चांगली राहतील; रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी 'हा' पदार्थ खा

गरम पाणी आणि मध

NCBI मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, प्रौढ आणि 1 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी, मध कोरड्या खोकल्यापासून आराम देऊ शकतो. वास्तविक, मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो, ज्यामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते. तुम्ही चमचाभर दिवसातून अनेक वेळा घेऊ शकता.  चहा किंवा गरम पाण्यात मिसळून पिऊ शकता.

शरीरातलं घातक कोलेस्टेरॉल घटवण्यासाठी रोजच्या जेवणात हे पदार्थ खा, तब्येत राहील उत्तम

हळद आणि काळीमिरी 

हळदीमध्ये कर्क्युमिन हे एक संयुग असते ज्यामध्ये दाहक-विरोधी, अँटीव्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे कोरड्या खोकल्यासह अनेक स्थितींमध्ये ते फायदेशीर आहे.  हळद काळ्या मिरीसोबत घेतल्यास कर्क्युमिन रक्तप्रवाहात चांगले शोषले जाते. संत्र्याच्या रसासारख्या पेयामध्ये 1 चमचे हळद आणि 1/8 चमचे काळी मिरी मिसळून तुम्ही याचे सेवन करू शकता.

तूप आणि काळी मिरी

तुपात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. घसा मऊ ठेवण्याचे काम करते. काळ्या मिरी पावडरमध्ये तूप मिसळून खाल्ल्यास कोरड्या खोकल्यामध्ये खूप आराम मिळतो.

मीठ आणि पाणी

मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यानं  कोरड्या खोकल्यामुळे होणारी अस्वस्थता आणि चिडचिड कमी होण्यास मदत होईल. खारट पाणी तोंड आणि घशातील बॅक्टेरिया मारण्यास देखील मदत करते. हे करण्यासाठी, एका मोठ्या ग्लासात कोमट पाण्यासह १ चमचे  मीठ विरघळवा. या पाण्यानं दिवसातून २ वेळा गुळण्या करा.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य