Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता

जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:32 IST2025-01-31T12:31:12+5:302025-01-31T12:32:16+5:30

जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो.

due to lack of vitamins in the body which vitamin deficiency causes excessive sleep | रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता

जर तुम्ही रात्री चांगली आणि गाढ झोप घेतली तर तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटतं. कधीकधी संपूर्ण रात्र झोपल्यानंतरही तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. सकाळी उठण्याची इच्छा होत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो. याचं कारण झोपेची कमतरता नसून शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते.

जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. व्हिटॅमिन्सची आणि मिनिरल्सच्या असंतुलनामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. असे अनेक व्हिटॅमिन्स आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे जास्त झोप येते. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त झोप येते ते जाणून घेऊया.

जास्त झोप का येते?

व्हिटॅमिन डी

जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी कमी होऊ लागतं तेव्हा झोपेचा त्रास होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि जास्त झोप येऊ शकते. जेव्हा व्हिटॅमिन डी कमी असतं तेव्हा शरीरात कॅल्शियम-फॉस्फरसची कमतरता देखील वाढते. त्यामुळे हाडांमध्ये वेदना होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते आणि दिवसभर आळस जाणवतो.

व्हिटॅमिन बी १२

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता देखील जास्त झोप येण्याचे एक प्रमुख कारण असू शकतं. जेव्हा व्हिटॅमिन बी १२ कमी असते तेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप झोप येऊ लागते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्यांचा धोका वाढतो. संशोधनात असं आढळून आलं आहे की, शरीरात व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे तुम्हाला आळशी वाटतं. तुम्हाला दिवसभर झोप येते. म्हणून, व्हिटॅमिन बी १२ समृद्ध आहार घ्या. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी १२ कमी असते. 

केवळ व्हिटॅमिन डी आणि बी१२च नाही तर इतर अनेक पोषक घटक झोपेच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्न सारख्या मिनरल्सचा समावेश आहे. त्यांच्या कमतरतेमुळे शरीरात आळस, थकवा आणि अशक्तपणा येतो. यामुळे तुम्हाला दिवसभर झोप येते. जर तुम्हाला बराच काळ असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: due to lack of vitamins in the body which vitamin deficiency causes excessive sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.