आजकाल धुळीचं, प्रदुषणाचं प्रमाण एवढं वाढलं आहे की प्रत्येकवेळी घराबाहेर पडताना चेहरा, नाक पुर्णपणे झाकून घेणं गरजेचं झालं आहे. सामान्य लोकांनाही धुळीचा त्रास (dust allergy) होतो आहे. त्यामुळे ज्यांना आधीच धुळीची ॲलर्जी आहे, त्यांचं दुखणं तर आणखी वेगळं. खूप शिंका येणं, नाक जाम होणं, सारखं नाक गळणं असा त्रास धुळीची ॲलर्जी असणाऱ्यांना कायमच जाणवतो. कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असणं म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती (immunity) कमी असणं. म्हणूनच धुळीची ॲलर्जी असेल किंवा मग इतर कसली ॲलर्जी वारंवार होत असेल तर हे काही पदार्थ आहारात (super food to reduce dust allergy) नियमितपणे खाल्ले पाहिजेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून ॲलर्जीचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होते.(Home remedies for dust allergy)
धुळीची ॲलर्जी होऊ नये यासाठीचं सुपरफूड १. आलं नाक, घसा या बाबतीतला कोणताही संसर्ग कमी करण्यासाठी आलं अतिशय गुणकारी ठरतं. त्यामुळे या बाबतीतल्या अनेक आयुर्वेदिक उपचारांमध्येही आल्याचा वापर आवर्जून केला जातो. २०१६ साली animal studyTrusted Source यांच्या अभ्यासानुसार असं सांगण्यात आलं आहे की, आल्यामुळे रक्तामधील pro-inflammatory proteins ची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे ॲलर्जीची लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ॲलर्जी कमी करण्यासाठी रोजच्या डाएटमध्ये आलं नियमित असावं.
२. हळद हळदीमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. शिवाय हळदीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे घटकही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांना वारंवार ॲलर्जीचा त्रास होत असेल त्यांनी हळदीचा काढा किंवा हळदीचे दूध आवर्जून घेतले पाहिजे.
३. लिंबूवर्गीय फळे कोणत्याही लिंबूवर्गीय फळांमध्ये किंवा Citrus fruits मध्ये व्हिटॅमिन सी माेठ्या प्रमाणावर असते. व्हिटॅमिन सी मुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे कोणत्याही ॲलर्जीचा त्रास पटकन होत नाहीत किंवा ॲलर्जीची लक्षणं खूप तिव्र स्वरुपात दिसून येत नाहीत. यासाठी लिंबू- कोमटपाणी आणि मध असं मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी घ्यावं. तसेच संत्री, मोसंबी, द्राक्ष, वेगवेगळ्या बेरी, किवी ही फळ नियमितपणे खावीत.
४. टोमॅटो धुळीच्या किंवा इतर कोणत्याही ॲलर्जीचा वारंवार त्रास होत असेल, तर नेहमीच आहारात टोमॅटो असावा. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी तर असतंच पण त्यासोबतच त्यात असणारा लायकोपीन हा घटक शरीरातील कोणत्याही प्रकारचा दाह किंवा संसर्ग कमी करण्यास मदत करतो. कच्च्या टोमॅटोतील लायकोपीनपेक्षा शिजलेल्या टोमॅटोतील लायकोपीन रक्तामध्ये जलद विरघळतो. त्यामुळे ॲलर्जीचा त्रास टाळण्यासाठी टोमॅटो खात असल्यास शिजवलेला टोमॅटो खाण्यास प्राधान्य द्यावे.