प्रत्येकालाच शरीराच्या विविध अवयवांसंबंधित (Health Tips) समस्या असतात. हिवाळ्यात अनेकदा कान (Ear Pain) आणि दातदुखीचा त्रास छळतो. मुख्यतः कानाच्या संसर्गाचा (Ear Ache) त्रास होतो. इतर अवयवांच्या तुलनेत कान फार नाजूक असतात. कानाच्या पडद्याला जखम झाली तर, असह्य वेदना होतात. बऱ्याचदा आपण कान नीट स्वच्छ करत नाही. ज्यामुळे कानाच्या संसर्गाचा धोका वाढतो.
कानामध्ये मळ, कान जड झाल्यासारखे वाटणे, कानाच्या मागची बाजू दुखणे, अशा समस्या उद्भवत असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कानातला मळ वेळीच नाही काढल्यास, कानाचा संसर्ग वाढण्याची स्थिती निर्माण होते. कानात संसर्ग होण्याचा धोका वाढत असल्याचं नक्की कळतं कसं? कानाला इजा पोहचू नये म्हणून काळजी कशी घ्यावी?(Ear Pain? Is It Just Cold, Ear Infection Or Something Else?).
कानातून मळ बाहेर पडणे
लहान मुलांनाही कानाच्या संसर्गाचा त्रास होतो. जर लहान मुल सतत कान दुखण्याची तक्रार करत असेल किंवा, रडत असेल, झोपायला त्रास होत असेल आणि चिडचिडही होत असेल तर, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मोठ्या व्यक्तींमध्ये कानात दुखणे, ऐकण्यात अडचण, कानातून द्रव बाहेर पडणे यासारखी समस्या दिसून येतात.
पाण्यात कडीपत्ता घालताच होईल जादू; बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी - हृदयही राहील निरोगी
कानात संसर्ग होण्यामागची कारणं
कानात संसर्ग शक्यतो बॅक्टेरिया किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे होतो. या संसर्गामुळे फ्लू, सर्दी इत्यादीसारखे इतर संसर्ग देखील होऊ शकतात. नाकाभोवती सूज निर्माण होऊ शकते. शिवाय घशापर्यंत वेदना जाणवू शकतात.
ईअरबडचा वापर टाळा
जर कान दुखत असेल तर, ईअरबडचा वापर शक्यतो टाळा. जर कान दुखत असेल तर, हॉट पॅडच्या सहाय्याने आपण कानांना शेक देऊ शकता. जर जास्त प्रमाणात कान दुखत असेल तर, २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ कान शेकू नये. यामुळे कानाचा त्रास वाढू शकतो.
गरम - गार पदार्थ खाल्ल्यावर ठणक लागतो? १ टीप; तज्ज्ञ सांगतात - दातांमध्ये तीव्र वेदना जाणवणार नाही
डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?
मुलांच्या कानात मळ सतत बाहेर पडत असेल तर, यासह सतत चिडचिड होत असेल तर, डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. शिवाय मोठ्या व्यक्तींना सतत कानाचा त्रास होत असेल तर, तीव्र वेदना होत असेल तर, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कानाच्या दुखण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.