Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Earwax Removal Tips : कानातला मळ कसा बाहेर काढायचा? कानाचं दुखणं वाढण्याआधी लक्षणं- उपाय समजून घ्या 

Earwax Removal Tips : कानातला मळ कसा बाहेर काढायचा? कानाचं दुखणं वाढण्याआधी लक्षणं- उपाय समजून घ्या 

Earwax Removal Tips : व्हायरल किंवा बुरशीजन्य संसर्ग हे कान वाहण्याच्या समस्येचे मुख्य कारण आहे. महिलांमध्ये, कान टोचल्यामुळे संसर्ग झाल्यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. कानात मळ किंवा घाण साचल्यामुळे कानांची समस्या देखील होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 04:50 PM2022-04-05T16:50:36+5:302022-04-05T18:13:11+5:30

Earwax Removal Tips : व्हायरल किंवा बुरशीजन्य संसर्ग हे कान वाहण्याच्या समस्येचे मुख्य कारण आहे. महिलांमध्ये, कान टोचल्यामुळे संसर्ग झाल्यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. कानात मळ किंवा घाण साचल्यामुळे कानांची समस्या देखील होऊ शकते.

Earwax Removal Tips : Ear discharge causes symptoms treatment | Earwax Removal Tips : कानातला मळ कसा बाहेर काढायचा? कानाचं दुखणं वाढण्याआधी लक्षणं- उपाय समजून घ्या 

Earwax Removal Tips : कानातला मळ कसा बाहेर काढायचा? कानाचं दुखणं वाढण्याआधी लक्षणं- उपाय समजून घ्या 

कान वाहणे किंवा कानात  मळ जमा होणं ही एक सामान्य समस्या मानली जाते आणि ती कोणत्याही वयात होऊ शकते. कानात स्त्राव होण्याच्या समस्येमुळे तुमच्या कानात दुखणे, लिक्विड डिस्चार्ज, श्रवण क्षमता कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. (Earwax Removal Tips ) महिलांमध्ये कान पिकण्याच्या समस्येचे मुख्य कारण कान टोचल्यामुळे होणारे संक्रमण मानले जाते. (Ear discharge causes symptoms treatment)

लहान मुलांमध्येही कान पिकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामुळे त्यांना ऐकण्यास त्रास होतो, कानात तीव्र वेदना होतात आणि पू वाहतो. कानात बॅक्टेरिया, फंगल इन्फेक्शन, विषाणू इत्यादींमुळेही ही समस्या उद्भवू शकते. या समस्येमध्ये कानातून पस बाहेर पडत राहतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये रक्त देखील बाहेर येऊ शकते. (Ways of Cleaning Your Ears) कान खराब होण्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेतल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. कान पिकण्याच्या समस्येची कारणे, लक्षणे आणि उपचार याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. (How to Safely Remove an Earwax Blockage at Home)

लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत  सगळ्यांनाच ही समस्या उद्भवते. ईएनटी डॉ. ए. ए खान यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.  त्यानुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये, व्हायरल किंवा बुरशीजन्य संसर्ग हे कान वाहण्याच्या समस्येचे मुख्य कारण आहे. महिलांमध्ये, कान टोचल्यामुळे संसर्ग झाल्यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. कानात मळ किंवा घाण साचल्यामुळे कानांची समस्या देखील होऊ शकते. कानात फोड वगैरे होत नसले तरी हा त्रास होण्याचा धोका असतो. कानातून स्त्राव होण्याच्या समस्येची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

कारणं (Causes of Earwax and Ear Discharge)

कान संसर्ग, उष्णतेमुळे, ऍलर्जीमुळे, कानात काहीतरी (पाणी, घाण किंवा धूळ, माती इ.) शिरल्यामुळे, कानाला दुखापत झाल्यामुळे, इअरबड्स किंवा इअरफोन्सचा अतिवापर, सर्दी, फ्लूमुळे, पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे,कान स्वच्छ न केल्याने, दातांच्या संसर्गामुळे. 

लक्षणं

कानातून पस येणे

कानात सतत तीव्र वेदना

ऐकण्यात अडचण

कानाच्या एका बाजूला वेदना

कान सुन्न होणे

कानांच्या समस्येवर घरगुती उपचार (Home Remedies for Ear Discharge)

१) कानातून पाणी गळण्याच्या समस्येवर तुम्ही पुदिना तेल वापरू शकता. कानात जंतुसंसर्गामुळे कान पिकण्याच्या समस्येमध्ये पुदिना वापरणे खूप फायदेशीर मानले जाते. 

२) सफरचंद साइड व्हिनेगर हलके गरम करून कानात घालणे देखील या समस्येवर फायदेशीर आहे.

३) या समस्येमध्ये लसणाच्या तेलाचा वापर देखील खूप फायदेशीर आहे.

४)  कानांचा त्रास तीव्रतेनं उद्भवत असेल तर त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घ्या.

Web Title: Earwax Removal Tips : Ear discharge causes symptoms treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.