आपली झोप गाढ आणि शांत झाली तरच आपला पुढचा दिवस छान फ्रेश जातो. पण झोप पूर्ण झाली नाही तर मात्र आपल्याला आळस, थकवा, अॅसिडीटी, अपचन अशा काही ना काही तक्रारी उद्भवत राहतात. रात्री किमान ७ ते ८ तास शांत आणि सलग झोप झाली तर आपण उत्साही आणि फ्रेश असतो. पण कधी कामाचा ताण, आरोग्याच्या तक्रारी, अतिविचार, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मोबाइलचा अतिवापर यांमुळे आपली झोप कमी होते. तर कधी काहीच कारण नसताना आपल्याला झोपच लागत नाही. मात्र अशावेळी झोपताना १ काम केल्यास त्याचा निश्चितच चांगला उपयोग होतो. बेडवर गेल्यानंतर दररोज झोपण्याआधी न चुकता काही योगासने केल्यास त्याचा काय फायदा होतो ते पाहूया (Easy 5 Minutes Remedy for Sound Sleep)...
१. वज्रासनात बसायचे आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवायचे. त्यानंतर उशी पोटाखाली ठेवून त्यावर झोपायचे.
- रिलॅक्स वाटण्यास मदत होते.
- वज्रासनात आणि पोटावर झोपल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते २. बटरफ्लाय पोझ पण यामध्ये पाठ जमिनीला टेकलेली आणि हात बाजूला ठेवून रिलॅक्स व्हायचे.
- यामुळे हार्मोन्सचा बॅलन्स राखण्यास मदत होते.
- पाठ आणि कंबरदुखी कमी होण्यास मदत होते
- ताण आणि भिती कमी होते
- रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर
- थकवा कमी होण्यास उपयुक्त
३. पाठ टेकवून कंबरेच्या खालचा भाग भिंतीला किंवा वरच्या बाजूला टेकवून ठेवायचा.
- यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
- पचनक्रिया सुधारण्यास फायदेशीर
- पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या वाढण्यास याची मदत होते आणि गर्भधारणेसाठी हे फायदेशीर असते.