शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी फुफ्फुसं निरोगी मजबूत असणं खूपच गरजेचं असतं. फुफ्फुसांमधलं संक्रमण तुम्हालाही कोणत्याही गंभीर समस्येत टाकू शकतं. व्हायरल इन्फेक्शन झाल्यास फुफ्फुसांमध्ये कफ जमा होऊ लागतो. जर तुम्ही ब्रोन्किइक्टेसिस आणि क्रोनिक ऑब्सट्रटिव्ह पल्मोनरी डिसिज यांसारख्या आजारांना टाळू इच्छित असाल तर फुफ्फुसांमध्ये साचलेला कफ साफ करणं खूप गरजेचं आहे. (Easy And Effective Home Remedies To Get Rid Lungs)
छातीतला कफ जास्त प्रमाणात वाढल्यामुळे वायू मार्ग बंद होऊ शकतो. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.. वाढलेला कफ न्युमोनिया यांसारख्या संक्रमणाचे कारण ठरते. श्वसनमार्ग कमकुवत होऊ नये यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Health Tips)
1) आलं
आल्याच्या सेवनानं सुका खोकला कमी करता येतो. यात एंटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे थकवा आणि वेदनांपासूनही आराम मिळतो. अनेक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो. 2015 च्या एका अभ्यासानुसार आल्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. आलं आणि मध पारंपारीक औषध म्हणून खोकल्यावर उत्तम उपाय आहे. आल्याचा चहा किंवा काढासुद्धा तुम्ही पिऊ शकता.
२) निलगिरी
निलगिरीच्या उत्पादनांचा अनेक वर्षांपासून खोकला कमी करण्यासाठी आणि कफ कमी करण्यासाठी वापर केला जात आहे. निलगिरीच्या तेलाचे काही थेंब नाक आणि छातीत घातल्यास कफ कमी होण्यास मदत होते. गरम पाण्यात हे तेल मिसळून अंघोळ करा.
कॅल्शियमच्या कमतरतेनं हाडंच नाही मेंदूसुद्धा होतोय पोकळ; लक्षणं ओळखा, शरीर निरोगी राहील
३) कच्ची हळद
कच्ची हळद तुमचं काम सोपं करू शतके. थोड्या कच्च्या हळदीचा रस घ्या त्याचे काही थेंब आपल्या घश्यात घाला. नंतर थोडावेळ तसंच थांबा. नंतर हळदीचा रस कोमट पाण्यात मिसळून गुळण्या करा. हळदीत करक्यूमिन नावाचे सक्रिय यौगिक असते ज्यामुळे कफ कमी होण्यास मदत होते. यात एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी व्हायरल गुण खोकला आणि सर्दीवर उपाय करण्यास मदत करतात.
सकाळी उठल्यानंतर गरम प्यायल्यानं खरंच वजन कमी होतं का? पाहा यात कितपत तथ्य
४) गरम पाणी
फुफ्फुसांमधील कफपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पातळ पदार्थांचे सेवन करायला हवे. पातळ पदार्थांचे सेवन केल्यास कफ पातळ होण्यास मदत होते. त्यातील गरम तरल पदार्थ छाती आणि नाकातला कफ बाहेर काढण्यास मदत करतात. तुम्ही गरम पाणी, सूप, ग्रीन टी चे सेवन करू शकता.