Join us   

थंडीत गुडघे ठणकतात? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात २ सोपे उपाय, गुडघेदुखीपासून मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2023 11:54 AM

Easy Ayurveda Remedies For Knee Pain : थंडीच्या दिवसांत तर ही समस्या जास्तच वाढते, त्यामुळे यावर वेळीच उपाय करायला हवा.

ठळक मुद्दे एकदा गुडघे दुखायला लागले की काही सुधरत नाही, मात्र हा त्रास वाढू नये यासाठी वेळीच उपाय करावेतबस्ती आणि जानुबस्ती यामुळे गुडघेदुखीची समस्या निश्चित कमी होऊ शकते.

गुडघेदुखीची समस्या असणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वयाच्या पन्नाशीत गाठणारा हा आजार आता तिशीतच युवापिढीला गाठतो. विशेषत: महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणत उद्भवत असल्याचे चित्र आहे.  बदलत चाललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव व व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ही समस्या डोकं वर काढते. लिफ्टचा वापर, सतत गाडीवर फिरणे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती यांमुळे कमी वयात गुडघेदुखीचा त्रास उद्भवतो. लठ्ठपणा हेही गुडघेदुखीचे एक महत्त्वाचे कारण आहे (Easy Ayurveda Remedies For Knee Pain). 

महिला दिर्घकाळ ओट्यापुढे उभ्या राहिल्याने, सतत कष्टाची कामे केल्याने गुडघे दुखू शकतात. तर तुम्ही वापरत असलेली पादत्राणे योग्य नसतील, घराची फरशी कडक असेल तर टाचा आणि त्यानंतर गुडघे यांचे दुखणे मागे लागते. एकदा गुडघेदुखी मागे लागली ना धड चालता येतं ना उभं राहता येतं ना खाली बसता येतं. त्यामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. थंडीच्या दिवसांत तर ही समस्या जास्तच वाढते, त्यामुळे यावर वेळीच उपाय करायला हवा. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यावर अगदी सहज करता येईल असा सोपा उपाय सांगतात. 

कसे करायचे उपाय...

१. सुंठ आणि मेथीच्या दाण्यांची पावडर समान प्रमाणात एकत्र करुन एका डबीत भरुन ठेवायची. सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर गरम पाण्यातून १ चमचा ही पावडर घ्यायची. यामुळे गुडघेगुखी कमी होण्यास मदत होते. घरच्या घरी होणारा हा सोपा उपाय आहे. 

२. ज्यांना वयामुळे किंवा ओस्टीओपोरोसिस म्हणजेच हाडे ठिसूळ झाल्याने दिर्घकाळापासून गुडघेदुखीचा त्रास होत आहे अशांना गुडघ्याची वाटी बदलण्यास सांगितले जाते. मात्र आयुर्वेदातील पंचकर्म उपचार यावर अतिशय फायदेशीर ठरतात. बस्ती आणि जानुबस्ती यामुळे गुडघेदुखीची समस्या निश्चित कमी होऊ शकते. मात्र यासाठी तुम्हाला आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करायला हवेत.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सघरगुती उपाय