Join us   

वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, हृदयाचे कार्य राहील ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 1:35 PM

Easy Ayurvedic Home remedy to reduce cholesterol : वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यातील आरोग्याच्या समस्या नियंत्रणात राहू शकतात

शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीरातील सर्व घटकांचे प्रमाण योग्य असायला हवे. पण काही कारणांनी हे प्रमाण कमी-जास्त झाल्यास आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. कोलेस्टेरॉल ही अशी एक गोष्ट आहे जी वाढल्याने आपल्या शारीरिक कार्यात अडथळे निर्माण होतात. कोलेस्टेरॉल हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण करणारा महत्त्वाचा घटक असल्याने ते वाढू न देणे आवश्यक असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि त्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळा येतो (Easy Ayurvedic Home remedy to reduce cholesterol). 

 म्हणूनच वयाच्या चाळीशीनंतर आपण स्वत:हून नियमितपणे काही तपासण्या करायला हव्यात. व्यायामाचा अभाव, चुकीची आहारपद्धती, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, ताणतणाव, धूम्रपान आणि मद्यपान  यांमुळे कोलेस्टेरॉलची समस्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यातील आरोग्याच्या समस्या नियंत्रणात राहू शकतात अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आपण काहीच करु शकत नाही. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनोज भावसार यासाठीच १ सोपा घरगुती उपाय सांगतात. हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा पाहूया..  

उपाय काय? 

१. थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर प्रमाणात आवळे उपलब्ध असतात. या आवळ्यांचा ज्यूस काढून तो १० मिलीलीटर ज्यूस घ्यायचा.

२. यामध्ये २.५ मिलीलीटर आल्याचा ज्यूस करुन तो घालायचा. 

३. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे मिश्रण प्यायचे. 

आहारात कोणते बदल करावेत? 

१. आहारात लसूण, कडीपत्ता, कांदा यांचा समावेश वाढवायला हवा.

२. शेवग्याच्या शेंगांचे आहारातील प्रमाण वाढवल्यास त्याचा कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी चांगला फायदा होतो.

३. भाजी किंवा आमटी करण्यासाठी इतर कोणत्याही तेलांपेक्षा तिळाचं आणि मोहरीचं तेल वापरायला हवं.

४. भूक लागल्यावरच खायला हवे आणि जड अन्नपदार्थ शक्यतो टाळायला हवेत.

५. रात्रीच्या वेळी जड पदार्थ टाळलेले केव्हाही जास्त चांगले तसेच जेवल्यावर लगेच झोपायला नको. 

६. चालणे, धावणे, योगा यासारखा किमान व्यायाम अवश्य करायला हवा. 

७. ताणतणाव टाळण्यासाठी नियमित प्राणायाम करणे गरजेचे आहे. 

८. रात्री लवकर झोपून लवकर उठणे आवश्यक आहे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल