Join us   

सकाळी उठल्या उठल्या अंग ठणकतं, असह्य वेदना होतात? डॉक्टर सांगतात 1 सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 1:28 PM

Easy Ayurvedic Remedies for Body Pain and Stiffness In the Morning : आतड्यांमध्ये जमा झालेली घाण किंवा टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडावेत यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो.

सकाळी झोपेतून उठल्यापासून आपण दिवसभर धावत राहतो. उठल्यापासून आपल्या डोळ्यासमोर कामांची यादी असते. महिलांच्या बाबतीत तर त्यांना घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे करता करता स्वत:कडे पाहायलाही वेळ होत नाही. घरातले, बाहेरचे, ऑफीसचे असे करता करता दिवस कधी मावळतो कळतच नाही. रात्री उशीरा सगळे झोपल्यावर आपण पाठ टेकतो आणि सगळे उठायच्या आधी आपण उठतो. अशावेळी झोपेतून उठल्यावर आपलं अंग बरेचदा ठणकत असतं. अंथरुणातून बाहेर यायचीही इच्छा होत नाही. अशक्तपणा, थकवा असं सगळं जाणवत असल्याने आराम करावासा वाटतो (Easy Ayurvedic Remedies for Body Pain and Stiffness In the Morning). 

(Image : Google)

काही वेळा तर शरीराला एकप्रकारची सूज आलेली असते, मात्र समोर कामं आ वासून उभी असतात. यासाठी तसेच मूळव्याध, पचनाच्या तक्रारी अशा सगळ्यावर उपयुक्त असा एक आयुर्वेदीक उपाय आज आपण पाहणार आहोत. आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मिहीर खत्री काही महत्त्वाची माहिती शेअर करतात. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण किंवा टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडावेत यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. ही अंगदुखी होण्याची अनेक कारणे असतात. मात्र आयुर्वेदात त्यासाठी एक सोपा उपाय आहे. हा उपाय योग्य ते मार्गदर्शन घेऊन केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. 

नेमका उपाय काय? कसा करायचा?

आयुर्वेदीक दुकानात मिळणारी हरीतकीची पावडर आणि गूळ असे २ पदार्थ यासाठी आवश्यक असतात. हे दोन्ही एकत्र करुन याचे मिश्रण तयार करायचे आणि सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेला हे मिश्रण घ्यायचे.

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी असे २ वेळा हे मिश्रण घ्यायचे. हा प्रयोग सलग १४ दिवस म्हणजेच २ आठवडे करायचा. या काळात जड अन्न न घेता शक्य तितका हलका आहार घ्यावा. यामध्ये भात, मूगाची खिचडी, पुलाव, उपमा, खीर अशा पदार्थांचा समावेश करावा. १४ दिवसांनी आपली अंगदुखी आणि पचनाच्या तक्रारी दूर झालेल्या असतील. मात्र ज्यांना उष्णतेचे विकार आहेत त्यांनी हा उपाय टाळलेलाच बरा असेही वैद्य खत्री सांगतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलघरगुती उपाय