Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात पुरळ, रॅशेस येतात, खाज सुटते? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम...

उन्हाळ्यात पुरळ, रॅशेस येतात, खाज सुटते? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम...

Easy Ayurvedic Remedy For Skin Care in Summer : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी असाच एक सोपा उपाय सांगितला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 03:18 PM2023-04-26T15:18:30+5:302023-04-26T15:29:32+5:30

Easy Ayurvedic Remedy For Skin Care in Summer : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी असाच एक सोपा उपाय सांगितला आहे.

Easy Ayurvedic Remedy For Skin Care in Summer :Summer acne, rashes, itching? Doctors say 1 simple solution, you will get instant relief... | उन्हाळ्यात पुरळ, रॅशेस येतात, खाज सुटते? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम...

उन्हाळ्यात पुरळ, रॅशेस येतात, खाज सुटते? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम...

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेताना आपल्याला त्वचेचीही विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाचा कडाका तीव्र असल्याने त्वचा काळवंडणे, त्वचेवर रॅश येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. इतकेच नाही तर उकाड्याने घाम येतो आणि तो शरीरावर तसाच राहीला तर पुरळ येणे, खाज सुटणे, लाल होणे अशा समस्याही उद्भवतात. उन्हाळ्याच्या दिवसांत एकदा हे त्रास सुरू झाले की आपल्याला काही सुचत नाही. मग काही ना काही घरगुती उपाय करुन आपण त्यापासून आराम मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा अगदीच जास्त झालं तर डॉक्टरांकडे जाऊन उपाययोजना करतो (Easy Ayurvedic Remedy For Skin Care in Summer). 

आयुर्वेदात असाच एक सोपा उपाय सांगितला आहे. वाळा हा गवताचा एक प्रकार असून भारतात तो सहज उपलब्ध होतो. माठातल्या पाण्याला चांगला वास यावा यासाठी आपण उन्हाळ्यात आवर्जून माठात वाळा घालतो. इतकेच नाही तर शरीराला थंडावा मिळावा म्हणून वाळ्याचे सरबतही प्यायले जाते. त्याचप्रमाणे त्वचेच्या समस्यांसाठीही वाळा कसा उपयुक्त ठरतो याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी असाच एक सोपा उपाय सांगितला आहे. तो कसा करायचा आणि त्वचेच्या तक्रारी दूर होण्यासाठी त्याचा कसा फायदा होतो पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

उपाय काय?

वाळ्याच्या गवताची बारीक पावडर करायची. यामध्ये साधे पाणी किंवा गुलाब पाणी घालायचे. ही पेस्ट चेहऱ्याला आणि इतर आवश्यक त्या ठिकाणी त्वचेवर लावायची. १५ ते २० मिनीटे ही पेस्ट चेहऱ्यावर फेस मास्कप्रमाणे ठेवायची आणि मग चेहरा पाण्याने धुवून टाकायचा. यामुळे त्वचेचा काळेपणा तर दूर होतोच पण उन्हामुळे त्वचेची आग होणे, रॅश येणे अशा काही समस्या उद्भवल्या असतील तर त्या दूर होण्यासही याची चांगली मदत होते.

फायदे 

१. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होते. 

२. त्वचा ग्लो करण्यासही याचा चांगला उपयोग होतो. 


३. शरीराचा काही कारणाने दाह होत असेल तर तो कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. 

४. प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल, त्यामुळे खाज आणि वास येत असेल तर आवळा चूर्ण घालून ही पेस्ट उटण्याप्रमाणे आंघोळीपूर्वी वापरल्यास उन्हाळ्यात फायदा होतो. 
 

Web Title: Easy Ayurvedic Remedy For Skin Care in Summer :Summer acne, rashes, itching? Doctors say 1 simple solution, you will get instant relief...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.